Subscribe Us

header ads

आ पवार बालेकील्यात सुरूंग; संजय नगर मधिल अंसख्य कार्यकर्त्याचा वंचितमध्ये प्रवेश

बीड स्पीड न्यूज 

आ पवार बालेकील्यात सुरूंग; संजय नगर मधिल अंसख्य कार्यकर्त्याचा वंचितमध्ये प्रवेश 

गेवराई दि १० ( वार्ताहार ) नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्या असताना वचिंत मध्ये अनेक पक्ष, संघटनेतील तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या उत्साहात प्रवेश करत असतांनाच यात भर पडली असून गेवराई शहरातील संजय नगर आ पवारांच्या बाल्लेकील्यात वंचितमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी  जाहिर प्रवेश केला. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष प्रा. विष्णु जाधव, जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे, सुदेश पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेख दस्तगिर यांच्यासह असंख्य मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी वंचित मध्ये जाहिर प्रवेश केला शेख शहानवाज, शेख असद, शेख आरबाज, शेख रकिब,शेख सिराज,शहेबाज सय्यद, शकिल सय्यद, शेख साेहेल, शेख आयुब, माऊली काळे, करण चाळक, लखण पवार, सुमित शिंदे, दिपक क्षीरसागर, रोहित साळवे, शंकर राऊत यांच्यासह गेवराई शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी दि. ९ बुधवार रोजी शासकीय विश्रामगृह गेवराई येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी किशोर भोले, किशोर चव्हाण,सतिष प्रधान, ज्ञानेश्वर हवाले उपस्थित होते. 
प्रस्थापित पक्षांना डावलून वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेक दिग्गज जाहिर प्रवेश करत आहेत. ईतर प्रस्थापित पक्षात केवळ निवडणुका संपेपर्यंत कार्यकर्त्यांचा रॅली, मोर्चात, शक्तीप्रदर्शन करण्यासाठी केवळ झेंडे मिरवन्यापुरता वापर करून त्या कार्यकर्त्याला नंतर वाऱ्यावर सोडले जाते. निवडणुका संपल्यानंतर इतर पक्षातील पुढारी कार्यकर्त्याला मान सन्मान दिला जात नाही. जिवाचे रान करून कार्यकर्ते जमवनाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना निवडणुकीत मोठ्या पदाची उमेद्वारी देत नाहीत ते आपल्या कुटुंबातील किंवा नातलगातील कोणाला तरी उमेद्वारी देऊन कुटुंबशाही बळकट करण्याचे काम करतात. याऊलट वंचित मध्ये स्वत: निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याने कार्यकर्त्यांना स्वाभिमानाने वावरता येते. नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती सारख्या निवडणूकीच्या उमेद्वारीत कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने प्रस्थापित पक्षांना सोडचिट्ठी देत तसेच प्रस्थापित पक्षांना डावलून बहूजन हृदयसम्राट मा. खा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवुन वंचित बहुजन आघाडी मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने गेवराई तालुक्यात वंचितची मोठी ताकद निर्माण झाल्याने येणाऱ्या निवडणुकात वंचित प्रस्थापितांना टक्कर देणारा पक्ष ठरत असून सत्तेचे समिकरणात वंचितची भुमिका निर्णनायक ठरणारी राहिल.तसेच या प्रवेशाने सत्ताधारी याच्या बालेकील्यात सुंरूग लावला असल्याचे दिसुन येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा