Subscribe Us

header ads

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त गेवराई येथे धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


संत सेवालाल महाराज जयंती निमित्त गेवराई येथे  धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
सर्व संघटना होणार सहभागी.
-------------------------------------

गेवराई (प्रतिनिधी)- बंजारा समाजाचे दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या २८३ व्या जयंती निमित्त राष्ट्रीय बंजारा परिषद,गोर सेना,गोर बंजारा ब्रिगेड,बंजारा क्रांती दल आणि भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या वतीने गेवराई तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. गेवराई शहरातील सेवालाल नगर येथे मागील तेरा वर्षांपासून अखंडितपणे साजरा होत असलेल्या संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्ताने बंजारा एकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी गेवराई तालुक्यातील बंजारा समाजातील निवृत्त अधिकारी,कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध ठिकाणी दवाखान्यात रूग्णांची सेवा करीत असलेले डॉक्टर्स आणि नीट परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन एमबीबीएस साठी पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार बंजारा एकता मेळाव्यात करण्यात येणार आहे,अशी माहिती संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण, गोर सेना डॉक्टर विंगचे प्रदेश अध्यक्ष डॉ.जीवन राठोड,गोर बंजारा ब्रिगेडचे बीड जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब राठोड, बंजारा क्रांती दलाचे बीड जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्थेचे बीड जिल्हा अध्यक्ष बी.जे.राठोड यांनी दिली.बंजारा समाजाचे दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचा जन्म गोलालडोडी तांडा ता.गुत्ती- बेल्लारी जि.अनंतपुर आंध्र प्रदेश येथे १५ फेब्रुवारी १७३९ रोजी पिता भिमानायक आणि माता धरमणीयाडी यांच्या उदरी झाला.देशातील बंजारा समाज बांधव संत सेवालाल महाराज यांची जयंती स्वाभिमानाने प्रेरणादिन म्हणून अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून थाटामाटात साजरी करतात.भारतातील सव्वीस राज्यात वास्तव्यास असलेल्या १५ कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बंजारा समाजाला एकत्रित आणून एका माळेत गुंफण्याचे अवघड काम संत सेवालाल महाराज नावाची शक्ती करते असी देशातील बंजारा समाजाची धारणा आहे.अनेक सामाजिक नेत्यांच्या पुढाकाराने मागील पंचवीस तीस वर्षांपासून बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.सन २००९ साली गेवराई शहरात सेवालाल नगर (बंजारा इस्टेट)ची उभारणी करण्यात आली.तेंव्हा पासून गेवराईत भव्य दिव्य स्वरुपात सेवालाल महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो.या निमित्ताने अनेक सामाजिक शैक्षणिक साहित्यिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात.या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्यागी व समर्पित बंजारा व बहुजन समाजातील  व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो.मंगळवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता सेवालाल नगर,गेवराई जि.बीड येथे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा पार पडणार आहे.सदरील जयंती सोहळ्यात सामाजिक धार्मिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच बंजारा समाजाचा प्राचीन इतिहास हे अनमोल पुस्तक भेट म्हणून दिला जाणार आहे.तरी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित बंजारा एकता मेळावा,भोग भंडारा व सत्कार सोहळ्याला तालुक्यातील बंजारा समाजातील आजी माजी जिप पंस सदस्य,सरपंच,उपसरपंच चेअरमन,कर्मचारी,अधिकारी, महिला,युवक,विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंजारा समाजाची परिवर्तनवादी चळवळ गतिमान करावी असे आवाहन बी.जे.राठोड,कृष्णा राठोड,अनिल राठोड, बाबासाहेब राठोड,डॉ.विश्वनाथ राठोड,बबन राठोड,आर.डी. पवार,संजय चव्हाण,छगन पवार,अंकुश पवार,परमेश्वर राठोड,सुदाम चव्हाण,प्रकाश राठोड,गणेश चव्हाण,योगेश पवार, गणेश राठोड,विनायक चव्हाण,गोरख पवार,सुरेश चव्हाण,शिवाजी राठोड,लहू राठोड,रमेश राठोड,अप्पासाहेब चव्हाण,रविंद्र राठोड,एकनाथ आडे,रमेश जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक