Subscribe Us

header ads

उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्याकडून खोडवा सावरगाव येथील शेतकरी कुटुंबातील गणेश गुट्टे यांची एमबीबीएसला निवड झाल्याबद्दल सत्कार

बीड स्पीड न्यूज 


उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्याकडून खोडवा सावरगाव येथील शेतकरी कुटुंबातील गणेश गुट्टे यांची एमबीबीएसला निवड झाल्याबद्दल सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील शेतकरी कुटुंबातील गणेश बापुराव गुट्टे यांचा नुकताच एमबीबीएसला प्रवेश मिळाल्याबद्दल पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. परळी पंचायत समिती येथे उपसभापती यांच्या दालनात गुरूवार, दि.10 फेब्रुवारी रोजी  खोडवा सावरगाव येथील शेतकरी बापुराव गुट्टे यांचा मुलगा गणेश गुट्टे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थिती कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील त्यांनी 720 पैकी 565 उच्च गुण प्राप्त करत एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे.  शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील गणेश गुट्टे यांनी एमबीबीएससाठी पात्र झाले आहेत ही अभिमानाची बाब व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कुरेशी यांनी यावेळी केले आहे. खोडवा सावरगाव येथील शेतकरी बापुराव गुट्टे हे शेतकरी सर्वसामान्य आर्थिक परिस्थितीमध्ये असतांना मुलांना शिक्षण देण्यात सदैव आघाडीवर राहिले. सामाजिक भान ठेवून भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामधून मुले उच्च विद्याविभूषित व्हावीत आणि उच्च शिखर गाठावे या स्वप्नपूर्तीसाठी बापुराव गुट्टे यांनी मोठे कष्ट घेतले. मुलगा गणेश याने ही फार मोठे परिश्रम घेऊन एम बी बी एस या वैद्यकीयक्षेत्रातील महत्वपूर्ण शाखेला प्रवेश मिळवून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. निवड झाल्यानंतर पंचायत समिती येथे सत्कार करण्यात आले. यावेळी उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांच्यासह पंचायत समिती सदस्य मोहनराव आचार्य, नागपूरचे अनिल सौळंके, बापू दहिफळे, पंचायत समितीचे सामान्य प्रशासन अधिकारी निळकंठ दराडे, जलील कुरेशी परळी वैजनाथ, आरेफभाई, पंचायत समितीचे कर्मचारी बापू कावरे व इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा