Subscribe Us

header ads

हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली

बीड स्पीड न्यूज 

हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली 


बीड_ कर्नाटकमध्ये हिजाबवरुन चाललेल्या राजकारणाचा निषेध करत हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आलीय. या रॅलीत हिंदू महिलांनीही हिजाब परिधान करुन मुस्लिम महिलांना पाठिंबा दिला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली काढण्यात आली होती.एकीकडं कर्नाटकमधील मंत्री म्हणतात की तोडके कपडे घातल्याने महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढत आहेत तर मग आमच्या मुस्लिम बहिणी हिजाब वापरतात त्यांना का विरोध केला जातोय? मुस्लिम धर्मियांची संस्कृती आहे. पहिल्यापासूनच मुस्लिम महिला या हिजाब वापरतात. भारत देशात सर्वधर्मसमभाव आहे. घटनेने प्रत्येकाला मूलभूत हक्क दिले आहेत. त्यामुळे घटनेने दिलेले अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करु नका. तो आमचा अधिकार आहे, असं म्हणत बीडमध्ये मोर्चेकरी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. महिला हिजाब परिधान करुन या रॅलीमध्ये दाखल झाल्या होत्या राष्ट्रवादीच्या अॅड हेमा पिंपळे म्हणाल्या, अशा प्रकारे वाद निर्माण करणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे किंवा एखाद्या समाजाकडे सारखं या ना त्या विषयावरुन बोट दाखवणे आरएसएस आणि बजरंग दलातील गुंड प्रवृत्तीची लोकं काम करत आहेत. मात्र प्रत्येक संस्कृतीमध्ये एक लिहाजा आहे. प्रत्येक धर्माची आप आपली एक संस्कृती आहे. ती संस्कृती प्रत्येक धर्मातील लोक पाळतात. हिजाब हा प्रश्न पुढे मुळ प्रश्नांकडे डोळेझाक करण्याचं काम भाजप करत असल्याची टीका त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा