Subscribe Us

header ads

तुलसी महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

बीड स्पीड न्यूज 

तुलसी महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

बीड(प्रतिनिधी):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे दि.१५ फेब्रुवारी २०२२ रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व‌ तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली. संत सेवालाल महाराज यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य डि.जी.निकाळजे,प्रा.योगिता लांडगे, प्रा.डॉ.भाग्यश्री पवार, प्रा.प्राची पाठक, प्रा.शिल्पा बोराडे, प्रा.पूनम डोळस, प्रा.स्वाती साबळे,प्रा.गीतांजली कांबळे, प्रा.अंकुश सुर्वे,प्रा.विवेक जोगदंड,प्रा.भारत उघडे,प्रा.परशुराम जाधव,प्रा.किशोर वाघमारे, प्रा.विकास वाघमारे, प्रा.समीर मिर्झा, प्रा.सुरज वक्ते,प्रा.राहुल सोनवणे,प्रा.प्रकाश ढोकणे,बबन पांचाळ,संजय धुरंधरे,भाग्यविधाता साळवे,लिपिक प्रवीण रंगदळ, सुनीता साळुंके,शिपाई सुदर्शना वीर ,विजय नागरगोजे,विशाल रोडे,आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक