Subscribe Us

header ads

अभ्यासातील सातत्य यशाचा सक्सेस पासवर्ड मार्गदर्शन : अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरेंनी साधला बार्टीच्या विद्यार्थ्यांशी संवाद

बीड स्पीड न्यूज 


अभ्यासातील सातत्य यशाचा सक्सेस पासवर्ड

मार्गदर्शन : अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरेंनी साधला बार्टीच्या विद्यार्थ्यांशी संवाद


बीड / प्रतिनिधी_ प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये यश  मिळविण्याची क्षमता असते आपल्या अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते.असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकरी तुषार ठोंबरे यांनी केले.  शहरात सावंत प्लाझा, मित्र नगर चौकाजवळ शिवाजी नगर बीड येथे  बार्टी मार्फत सुरु असलेल्या सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे विद्यार्थ्यांशी स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शनपर संवाद साधतांना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे बोलत होते.यावेळी सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक राहुल वाघमारे, जेष्ठ साहित्यिक विचावंत केशव वाघमारे, सहाय्यक ग्रंथपाल अनिल डोंगरे, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनिल डोंगरे, दीपक दोनवणे, सेवानिवृत्त इंजि.काळुराम आठवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना तुषार ठोबरे म्हणाले की, अभ्यासात सातत्य ठेवले तर कोणत्याही परीक्षेत यश मिळविणे अवघड नाही.सर्वसामान्य विद्यार्थी सुध्दा युपीएससी एमपीएससी परीक्षेत यश मिळवू शकतो.प्रत्येक विद्यार्थ्यांने अभ्यासात सातत्य ठेवून पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करावेत आणि एखाद्या आयटी कंपनीत काम करण्यापेक्षा शिक्षक, प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करावी. बार्टीच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या संधीचे आणि प्रशिक्षणाचे आपण सोने केले पाहिजे. कारण आपण ज्या युगात वावरत आहोत ते युग अतिशय स्पर्धेचे गतीमान युग आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करीत असताना प्रचंड आत्मविश्‍वास असला पाहिजे. अगदी नेमकेपणाने निर्णय घेण्याची क्षमता अंगी असली पाहिजे. एवढेच नाही 

तर विद्यार्थ्यांनो स्वत:शी प्रामाणिकपणा ठेवून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करा त्याचबरोबर आवांतर वाचणावर देखील अधिक भर द्या. नूसते आवांतर वाचन करून भागणार नाही तर त्याच्या नोट्स काढायला शिका. कारण या खडतर प्रवासतूनच एक दिवस तुमच्या आयुष्यात असा नक्कीच येईल की,तुम्ही यशाची गोड फळे नक्की चाखाल. विद्यार्थ्यांनो प्रशासन सेवेत रूजु  झाल्यावर कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक मिळवा. तसेच आपले पद सदैव समाजाच्या कामी आले पाहिजे, असे कार्य नेहमी करीत राहा.असे प्रेरणादाई मत तुषार ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन सहाय्यक केंद्रप्रमुख प्रा.अविनाश वडमारे यांनी केले. आभार प्रा. राजेश काळे, राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सम्राट प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे कार्यालयीन कर्मचारी ग्रंथपाल सचिन काकडे,अर्जुन सपकाळ, दिपक वाघमारे यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा