Subscribe Us

header ads

पदभार स्वीकारण्यापूर्वीच या नवविर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांवर जमावबंदी आदेश मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 


पदभार स्वीकारण्यापूर्वीच या नवविर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांवर जमावबंदी आदेश मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल


केज_नगरपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर नगराध्यपदाची निवडणूक पार पडली.केजमध्ये काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. पण, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीनंतर उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं चांगलच महागात पडलं. पदभार स्वीकारण्यापूर्वीच या नवविर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांवर जमावबंदी आदेश मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.बीडच्या केज नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष उप नगराध्यक्ष व नगरसेवक अशा 11 जणा विरोधात जिल्ह्यात जमावबंदी आदेश मोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे.काँग्रेससोबत आघाडी करून जनविकास आघाडीच्या सिताताई बनसोड या केजच्या नगराध्यक्ष झाल्या. तर उपाध्यक्ष शीतल दांगट यांची निवड झाली. नूतन पदाधिकारी यांची त्यानंतर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत शेकडो लोकांचा जमाव होता. जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मिरवणूक, मोर्चे आंदोलन याला बंदी आहे. मात्र केजमध्ये ही बंदी मोडण्यात आल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशा 11जणांविरोधात जमावबंदी आदेश मोडल्या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा