Subscribe Us

header ads

डॉ.संतोष मुंडे व सुंदर गित्ते यांच्या माध्यमातून नंदागौळात मोफत तपासणी व श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न!

बीड स्पीड न्यूज 



डॉ.संतोष मुंडे व सुंदर गित्ते यांच्या माध्यमातून नंदागौळात मोफत तपासणी व  श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न!

गावातील 327 नागरिकांच्या कानाची कॉम्प्युटराईज्ड मशीनने तपासणी तर 12 कर्णबधीर नागरिकांना श्रवणयंत्राचे वाटप!

आरोग्यसेवा हिच खरी जनसेवा - डॉ.संतोष मुंडे

परळी(प्रतिनिधी)परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील 327 नागरिकांच्या कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व 12 श्रवणयंत्राचे  वाटप रविवारी 13 फेब्रुवारी रोजी करण्यात आले,यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे यांनी आरोग्य सेवा हीच खरी जनसेवा असल्याचे प्रतिपादन केले.याबाबत सविस्तर वृत्त की,सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे,मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे,परंतु सध्या अनेक नागरिकांची मागणी येत असल्याने गावातील नागरिकाना गावातच तपासणी व जाग्यावर श्रवणयंत्रांचे वापट करण्याच्या उद्देशाने कर्णबधिर असलेल्या नागरिकांच्या कानाची प्रत्येकी 500 रुपयांची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी करण्यात करण्यात आली,तसेच 12 नागरिकांना श्रवणयंत्र देण्यात आले,यावेळी गावातील नागरिकांना सकाळी 8 वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती,यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे यांनी आरोग्याचे महत्व पटवून देत आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा व जनसेवा असल्याचे प्रतिपादन केले आणि मागील 10 वर्षापासून नंदागौळकरासाठी अनेक आरोग्य  शिबिरे घेऊन जनसेवा सुरू असून येत्या काळात सुद्धा जनसेवेत कमी पडणार नसल्याचे सांगितले.यावेळी सिद्धेश्वर मुंडे,माजी सरपंच बाबुराव गित्ते,माजी सरपंच शंकरराव जगताप,माजी चेअरमन नारायण गित्ते,ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ जगताप,बाळू जगताप,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दिनकर गित्ते सह अनेक नागरिक,महिला-पुरुष  व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा