Subscribe Us

header ads

बीडचा शिवजन्मोत्सव सोहळा देखणार ठरेल!

बीड स्पीड न्यूज 



बीडचा शिवजन्मोत्सव सोहळा देखणार ठरेल!
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेझर शो, बाईक राईडस् लक्षवेधी इव्हेंट, झांज पथक ठरणार खास आकर्षण
आ.संदीप क्षीरसागर यांची पत्रकार परिषदेत माहिती


बीड (प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा बीडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ऐतिहासीक साजरा केला जातो. वर्गणी न घेता डीजेमुक्त बीडकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा बीडच्या चंपावतीनगरीतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा याहीवर्षी ऐतिहासीक व राज्यात देखणा ठरेल. शासनाने दिलेल्या सूचनांचे व कोव्हिड नियमांचे पालन करून बीडमध्ये शिवजयंती उत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. देशात गाजलेल्या वाराणसीच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेझर शो, झांजपथक, बाईक राईटस्चा लक्षवेधी इव्हेंट अशा विविध सांस्कृतीक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे.बीड येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत आ.संदीप भैय्या क्षीरसागर बोलत होते. यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जीवनराव जोगदंड, उपाध्यक्ष खुर्शीद आलम, माजी अध्यक्ष विजय पवार, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, वैजीनाथ नाना तांदळे, बबन बापु गवते, रमेश चव्हाण आदींची उपस्थिती यावेळी होती. बीडच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला अनेक वर्षाची परंपरा आहे. यावर्षी नाविन्यपुर्ण उत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्व कमिटीने घेतलेला आहे. दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता महापुजा होणार आहे. त्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कोव्हिड नियमांचे पालन करत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली किंवा रथ यात्रेस प्रारंभ होईल. त्यानंतर झांज पथक आणि बाईक राईडस् ही लक्षवेधी ठरणार आहे. यात विशेष म्हणजे बीडकरांना मुख्य आकर्षण असलेल्या आत्तापर्यंत मराठवाड्यात कोठेच झाला नाही असा आतंरराष्ट्रीय ख्यातीचा लेझर शो यावर्षी शिवजयंतीचे मुख्य आकर्षण असणार आहे. हा लेझर शो छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात येणार आहे. आतापर्यंत अशा लेझर शोच आयोजन मेट्रो सिटीमध्ये झालेलं आहे. वाराणसीमध्ये ज्या संस्थेने या लेझर शोचं काम केलं होत त्याच संस्थेच्या माध्यमातून बीडमध्ये लेझर शो दाखविला जाणार आहे. झांज पथक, बाईक राईड आणि लेझर शो अशा विविध कला प्रकरातून बीडकरांच्या डोळ्याचे पारणे फिटणारा आणि राज्यात देखणा ठरेल असा बीडचा शिवजयंती उत्सव सोहळा राहिल असे आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी म्हटले आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सवाची ओढ बीडकरांना लागलेली असते. मध्यंतरी कोव्हिड रूग्ण संख्या वाढल्यामुळे शिवजयंती उत्सव साजरा करता आला नाही. परंतू यावर्षी त्याच उत्सहात, त्याच जल्लोषात शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करत हा उत्साह साजरा केला जाईल असे यावेळी प्रा.विजय पवार यांनी सांगितले आहे.

महापुजेला जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांची राहणार उपस्थिती

दि.19 फेब्रुवारी रोजी सुर्योदया बरोबर सकाळी 7 वाजता शासकीय महापुजा होणार आहे. या शासकीय महापुजेला बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांची उपस्थिती राहिल. दरवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते शासकीय महापुजा केली जाते.

शिवप्रेमींना आनंद देणारा हा उत्सव सोहळा-अध्यक्ष जीवनराव जोगदंड


अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याची आतुरता बीडलाच नव्हे तर महाराष्ट्राला लागलेली असते. या शिवजन्मोत्सव सोहळ्याला महिलांची देखिल लक्षणीय उपस्थिती असते. वर्गणी आणि डिजेमुक्त शिवजयंती उत्सव सोहळा ही संकल्पना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्षपदी माझी शिवप्रेमींनी निवड केली त्याबद्दल सर्वांचे आभार. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजन्मोत्सव सोहळा देखणा आणि शिवप्रेमींना आनंद देणारा ठरेल. आपल्या सर्वांचे सहकार्य राहू द्या असे प्रतिपादन यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष जीवनराव जोगदंड यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा