Subscribe Us

header ads

शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

बीड स्पीड न्यूज 

शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना


बीड, दि. 15 (जि. मा. का.):- कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रजातीचे संक्रमण अद्याप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठया प्रमाणात एकत्र येऊन गर्दी  न करता उत्सव साजरा करावा. स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.कोविड अनुषंगाच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून काळजी घेण्याबाबत पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रभर शासन महसूल, वन अपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र. DMU/2020/CR.92/DisM -1,दि.8.1.2022 तसेच क्र.DMU/2020/CR/Dism-1, दि. 31 जानेवारी 2022 अंतर्गत दिलेल्या सूचनांचे व या शासनाच्या आदेशाच्या अनुषंगाने काटेकोर पालन करावे.दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ (शिवजयंती) साजरी करत असताना शिवज्योत वाहन्याकरिता 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.अनेक शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी अथवा इतर गड, किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” साजरी केली जाते,  परंतु यावर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.दरवर्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी सांस्कृतीक कार्यक्रमांचे मोठया प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साजरी करावी.‘छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या’ दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी ) नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालीका, नगर परिषद, नगरपंचायत, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे, तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी  केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा