Subscribe Us

header ads

बीड शहरात संत सेवालाल महाराजांची चौकात भव्य जयंती साजरी राजकीयसह सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिवादनाला उपस्थिती

बीड स्पीड न्यूज 

बीड शहरात संत सेवालाल महाराजांची चौकात भव्य जयंती साजरी

राजकीयसह सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिवादनाला उपस्थिती



बीड, दि.15 (लोकाशा न्युज)ः- जगाला शांतीचे आणि खर्‍याची शिकवण देणारे क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती बीड शहरातील सेवालाल महाराज चौक येथे भव्यदिव्य साजरी करण्यात आली. 

वसंतरावर्जी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, बीड जिल्हा गोर सेना, राष्ट्रीय बंजारा परिषद तसेच शहरातील बंजारा बांधवांच्यावतीने मंगळवारी सकाळी नऊ वाजता सेवालाल महाराज चौक येथे आ.संदीप क्षीरसागर, 

गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर, जि.प.महिला बालकल्याण सभापती बाबुराव जाधव, जि.प.बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ. 

सय्यद सलीम, धैर्यशील सोळंके, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, वडवणी पं.स.सभापती तानाजी अजबे, परशुराम गुरखुदे, स्वप्नील गलधर, शाहीद पटेल यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी 

संत सेवालाल महाराजांना अभिवादन केले.संत सेवालाल महाराजांची जयंती यशस्वी करण्यासाठी सुंदर राठोड, बिबीषण राठोड, प्रा.डॉ.जगन्नाथ चव्हाण, कृष्णा राठोड, अर्जून चव्हाण, अंकुश राठोड, प्रो.डॉ.आबासाहेब राठोड, प्रा.वसंत जाधव, नितीन चव्हाण, सुरेश पवार,भूषण पवार, प्रा.अर्जून राठोड, गणेश राठोड, राजूदास राठोड, शिवलाल राठोड, प्राचार्य राजेशकुमार राठोड, बाबासाहेब चव्हाण, इंजि.दिनेश चव्हाण, बाजीराव महाराज, देवीदास चव्हाण, उत्तम राठोड, दादाराव राठोड, श्रीराम राठोड, श्रीमंत राठोड, विठ्ठल राठोड, प्रकाश पवार, प्रकाश आडे व संपूर्ण बंजारा समाजातील अधिकारी कर्मचारी बांधवांच्या सहकार्याने कोरोना नियम व शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करुन अभिवादन करण्यात आले.


मागणी करताच आ.संदीप भैय्यांनी रस्ता काम लावले मार्गी

संत सेवाला महाराज चौकमधील निम्मा रस्ता राहिल्याने तेथील रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने शहरातील समाज बांधवांकडून जयंतीनिमित्त मुरूम व कचखडी टाकत रस्ता सुरळीत करण्यात आला होता. मात्र अभिवादनासाठी आ. संदिप भैय्या आल्यानंतर समाज बांधवांकडून त्या रस्त्याची मागणी करण्यात आली. यावेळी आ. संदीप क्षीरसागरांनी फक्त आश्वासनच न देता दुपारून त्या रस्त्याचे तात्काळ उदघाटन करत कामाला सुरवात केली. यामुळे समाज बांधवांकडून आभार व्यक्त करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा