Subscribe Us

header ads

भास्करराव मामा चाटे परळी भूषण पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 



भास्करराव मामा चाटे परळी भूषण पुरस्काराने सन्मानित

परळी, (प्रतिनिधी) परळी नगर परिषदेचे मा. बांधकाम सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते भास्करराव मामा चाटे यांना दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात दीपस्तंभ फाउंडेशन चे यजुर्वेंद्र महाजन व मान्यवरांच्या उपस्थित परळी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भास्करराव मामा चाटे यांना परळी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आधी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.दै.मराठवाडा साथीच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर येथे शहरातील सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍यां व्यक्तीना परळी भुषण पुरस्कार व विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम संपादक चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दीपस्तंभचे फाऊंडेशनचे यजुवेंद्र महाजन (जळगाव), दिलीप पारेकर आदी मान्यवर यांच्या हस्ते परळी भूषण पुरस्कार भास्करराव मामा चाटे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. भास्करराव मामा चाटे  यांना या अगोदरही पंढरपूर येथील ईगल ब्रँड आयकॉन पुरस्कार 2022 देऊन गौरविण्यात आले आहे.परळी भुषण पुरस्काराला उत्तर देतांना भास्करमामा चाटे  यांनी मराठवाडा साथीच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. परळी शौर्य भुषण, परळी अध्यात्मिक गुरु भुषण, परळी क्रीडा भुषण असे पुरस्कार यापुढे देण्याची सूचना त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा