Subscribe Us

header ads

डॉ. वासंती अमाेल चव्हाण कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 

ओळी : लोखंडी सावरगाव (ता. अंबाजोगाई) : स्त्री रुग्णालयात राजकिशोर मोदी यांच्या हस्ते डॉ. वासंती चव्हाण यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. चंद्रकांत चव्हाण, कौस्तुभ कोदरकर.
----
डॉ. वासंती अमाेल चव्हाण कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
-----

अंबाजोगाई, दि. ४ (प्रतिनिधी) : परिसरातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्रात भिषक व मधुमेह तज्ज्ञ म्हणून सेवेत असलेल्या डॉ. वासंती अमोल चव्हाण यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.गुरुवारी (दि. ३) अंबा पिपल्स को - ऑप. बँक, लि. अंबाजोगाईच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष व अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन डाॅ. चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. यावेळी स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, कौस्तुभ कोदरकर आदींची उपस्थिती होती. कोरेाना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यातील इतर कोविड रुग्णालयांपेक्षा लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालय व मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्रात सर्वाधिक रुग्णांवर उपचार झाले. तसेच, या ठिकाणी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक व मृत्यूदर सर्वात कमी होता.  या दोन्ही रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, स्टाफ नर्स व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कोरोना काळातील उपचारातील उत्तम कामाची दखल घेत या सर्वांचा अंबा पिपल्स बॅँकेच्या वतीने काेराेना योद्धा पुरस्काराने गौरव केला. त्या काळात केजच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. वासंती चव्हाण यांची स्त्री रुग्णालयात काेराेना रुग्णांवरील उपचारासाठी भिषक म्हणून प्रतिनियुक्ती करण्यात आली हाेती. त्यांनी रुग्ण उपचारात मोलाची भूमिका बजावली. याची दखल घेत त्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा