Subscribe Us

header ads

उच्च माध्यमिक पीएच.डी. धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-1 / वर्ग-2 पदी नियुक्ती करावी - मुप्टा ची मागणी

बीड स्पीड न्यूज 


उच्च माध्यमिक पीएच.डी. धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग-1 / वर्ग-2 पदी नियुक्ती करावी - मुप्टा ची मागणी

शासनाच्या शिक्षण विभागात पर्यवेक्षीय वर्ग-1 व' वर्ग-2 ही पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. शासनाकडून ही पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक वेळा माहिती मागविण्यात आली. आत्ताच  जानेवारी 2022 च्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नेट / सेट / पी.एचडी. धारक प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्ग-1 / वर्ग-2 / गटशिणाधिकारी / शिक्षण विस्तार अधिकारी /  प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय या पदावर सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय झाला असल्याचे माहिती समोर आली आहे. पात्रताधारक  शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. परंतु याच बरोबर खाजगी शासन मान्यताप्राप्त अनुदानीत उच्च माध्यमिक विध्यालयातील  शिक्षकांप्रती दुजाभाव दाखविण्यात आला आहे. अशी कुठलीच माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली नाही असे शासनाच्या पत्रावरून दिसते.
उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपले अध्यापनाचे नियमित कार्य सांभाळूनशिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च विद्यावाचस्पती(पीएच.डि.)  अहर्ता प्राप्त केली आहे. शासनाच्या सापत्न धोरणामूळे यांची पदवी निरर्थक ठरून शिक्षकांच्या मनात वैफल्याची भावना निर्माण होत आहे. . तरीही ब-याच  शिक्षकांनी कला, विज्ञान, वाणिज्य व क्रीडा अशा विविध शाखातून " विद्यावाचस्पती ” पदवी प्राप्त केली आहे. सदर पदांवरती उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुकी केल्यास त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा व  अनुभवाचा उपयोग शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी व नवीन  संकल्पना /उपक्रम राबविण्यासाठी होऊ शकतो.उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांप्रती हा दुजाभाव का ? अशी चर्चा राज्यभर शिक्षण क्षेत्रात होत असून नाराजीचा सूर उमटत आहे.शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्ग-1 / वर्ग-2 या पदावर प्राथमिक सोबत खाजगी शासन मान्यताप्राप्त अनुदानीत माध्यमिक व उच्च माध्यमिक पीएच.डी.धारक शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी मुप्टा चे  प्रा. शशिकांत जावळे (जिल्हाध्यक्ष(Jr.) यांनी केली आहे. लवकरच व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती दिली आहे. सर्व पात्रता धारक उ.मा. शिक्षक यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा