Subscribe Us

header ads

मांजरसुंबा घाटात वाहनाच्या धडकेत 10 वर्षीय मुलगा ठार; दोघे गंभीर

बीड स्पीड न्यूज 

मांजरसुंबा घाटात वाहनाच्या धडकेत 10 वर्षीय मुलगा ठार; दोघे गंभीर

बीड_भरधाव वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात 10 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. 3 फेब्रुवारी रोजी रात्री  साडेसातच्या सुमारास मांजरसुंबा घाट उताराला हा अपघात घडला. मयत मुलाचे मामा व आजी गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शेख आयान चांद (वय 10) असे मयताचे नाव आहे.दि  3 रोजी दुपारी परंडा (जि. उस्मानाबाद) येथील लग्न समारंभ आटोपून शेख सिराज दिलावर (वय 25), शेख मीनाबी दीलावर (वय 55) आणि शेख आयान शेख चांद (तिघे रा. नेकनूर ह.मु. बार्शी नाका, बीड) हे सायंकाळी दुचाकी क्रं. (एम. एच. 23 बीए 6301) बीडकडे येत असताना साडेसातच्या सुमारास मांजरसुंबा घाट उतरत असताना अज्ञात वाहनाने शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात शेख आयान चांद याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबतचे मामा शेख सिराज आणि आजी शेख मीनाबी हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना दुसऱ्या वाहनातून तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा