Subscribe Us

header ads

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार

बीड स्पीड न्यूज 

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार 


लखनऊ, 3 जानेवारी _ उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दोन लोकांनी त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केला आहे. आरोपींनी चार राउंड फायर केल्या, अशी माहिती ओवेसी यांनी स्वत: ट्विटरवर दिली आहे.काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार केला गेला. चार राउंड फायर झाल्या. ते तीन-चार लोकं होती. गोळीबार करुन सर्वजण पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली आहे. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून गेलो आहे. या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे.असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत.ओवेसी हे मेरठच्या किठौर येथील एका प्रचाराच्या कार्यक्रमानंतर दिल्लीच्या दिशेने जात होते. यादरम्यान छिजारसी टोल प्लाजाजवळ त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. घटनेनंतर अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.ओवेसींची एमआयएम पक्ष उत्तर प्रदेशात भागीदारी परिवर्तन मोर्चासोबत निवडणूक लढत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवेसी हे पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. या भागातील जिल्ह्यांमध्ये येत्या 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यासाठी आणि 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे या भागामध्ये सर्वच पक्षांकडून जोर लावला जात आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी रंगली असताना ओवेसी यांच्या ताफ्यावर अशाप्रकारे गोळीबाराची घटना घडल्याने उत्तर प्रदेश मध्ये गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय.सबंधित घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा