Subscribe Us

header ads

शुक्रवारी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी

बीड स्पीड न्यूज 


शुक्रवारी बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी
महिलांसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची उपस्थिती
उपचारातही मिळणार भरघोस सूट, बीडच्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलचा उपक्रम




बीड | प्रतिनिधी_मुळव्याधसारख्या आजाराच्या रुग्णांसाठी बीड येथील मुळव्याध तज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांनी सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटलच्या वतीने बीडमध्ये मोफत मुळव्याध तपासणी शिबीर शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी  २०२२ रोजी अयोजन केले आहे. या शिबीरात तज्ञ डॉक्टरांच्या वतीने पूर्णपणे मोफत तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची देखील उपस्थिती राहणार आहे. या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या रुग्णांना उपचारातही मोठी सूट देण्यात येणार असल्याची माहिती मुळव्याध तज्ञ डॉ. अमोल खेत्रे यांनी दिली. हे शिबीर  बीड शहरातील जालना रोड येथील सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल येथे होणार आहे.तपासणी न केल्यामुळे मुळव्याध हा आजार वाढतच जातो. त्यामुळे मुळव्याध-भगंदर-फिशरचे लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. अनेक रुग्ण पैसे नसल्याने तपासणी करत नाही. त्यांच्यासाठी आणि इतर सर्वांसाठीच सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल बीडच्या वतीने मुळव्याध- भगंदर-फिशरची मोफत तपासणीसाठी शिबीराचे अयोजन  शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी  २०२२ रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत करण्यात आले असून तज्ञ डॉक्टरांच्या वतीने तपासण्या करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या तपासणीसाठी तज्ञ महिला डॉक्टरांची देखील उपस्थिती राहणार आहे. या शिबीरातील रुग्णांना उपचारामध्ये  सवलतही देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अमोल सुधाकर खेत्रे (मुळव्याध व भगंदर तज्ञ) यांनी दिली. बीड शहरातील जालना रोड येथील डी.सी. लोढा कॉम्लेक्स, मंत्री बँकेच्या शेजारी असलेल्या सुश्रुत मुळव्याध हॉस्पिटल आणि डॉ. पाईल्स क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यामाने हे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. मुळव्याध-भगंदर-फिशर याचे लक्षणे मलप्रवृत्तीच्या वेळेस किंवा नंतर रक्त पडणे, शौच्याच्या जागेवर आजुबाजुला गाठ येणे, त्यामधून चिकट स्त्रव व रक्त येणे, शौचाच्या जागी आग होणे, वेदणा होणे, टोचल्यासारखे वाटणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकराचा भाग बाहेर येणे इत्यादी लक्षणे असल्यास त्याची तत्काळ तपासणी करुन त्यावर निदान करता येते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा आजार बळावतो. त्यासाठी तपाणी करुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे. या हॉस्पिटलमध्ये गुदगत आजारांसाठी क्षारसुत्र, क्षारकर्म, आग्रिकर्म सुरक्षित आयुर्वेदिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत. त्यासाठी तज्ञ डॉक्टर येथे उपलब्ध आहेत. या शिबीरामध्ये फोनवरही नाव नोंदणी करण्याची सुविध्दा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी गरजू रुग्णांनी ८६००२८७९७२, ७५१७७४७९७२, या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव नोंदवू शकता. असे अवाहन मुळव्याध तज्ञ डॉ. अमोल सुधाकर खेत्रे यांनी केले आहे. या शिबिराचा लाभ घेतला तर असाह्य मुळव्याधापासून आपली नक्कीच सुटका होणार असल्याचेही डॉ. खेत्रे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा