Subscribe Us

header ads

नवगण राजुरी सेवा सोसायटी आ.संदीप भैय्यांच्या ताब्यात

बीड स्पीड न्यूज 


नवगण राजुरी सेवा सोसायटी आ.संदीप भैय्यांच्या ताब्यात

बीड (प्रतिनिधी):- प्रतिष्ठेची समजली जाणारी नवगण राजुरी सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात आली असून नवगण राजुरी सेवा सहकारी संस्था सोसायटीच्या चेअरमन पदी अनिल बहीर व व्हाइस चेअरमन पदी गोकुळ जमदाडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. तर मुरलीधर बहीर, सुरेश बनकर, बबन गावडे, पोपट पवार, लक्ष्मण सातपुते, देविदास बहीर, राजेंद्र बहीर, कलीम शेख, गवळी विष्णु, काळे चंद्रकला, बहिर कांताबाई सदस्यपदी निवडुण आले आहे. या सेवा सोसायटीत विजय झालेल्या उमेदवारांचे गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर यांनी अभिनंदन केले आहे.
नवगण राजुरी सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक अटीतटीची झाली. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकीच्या रिंगणात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनलच्या विरोधात उभे होते. परंतू मतदारांनी त्यांच्या पॅनलला धुळ चारत आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या पॅनलचे उमेदवारांना विजयी केले आहे. यातील विजयी उमेदवारांचे आ.संदीप भैय्या क्षीरसागर, गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी डि.डि.आर.ऑफिसचे सांगुळे, सचिव बहिर, ग्रामसेवक शेलार मॅडम, उपसरपंच भगवान आण्णा बहीर, अनिल बनकर, शहादेव बहीर, ज्ञानेश्वर बहीर, बाळु गवळी, दिनेश बहिर, बाबु बहिर, किशोर बनकर, लक्ष्मण पांढरे, हानु गावडे, दत्ता गावडे, विशाल बहीर, दशरथ बहीर उपस्थिती होती.

माजी मंत्र्यांना गावातच बसला धक्का 

नवगण राजुरी सेवा सोसायटीची निवडणुक अटीतटीची झाली. स्वत:चे गाव असतांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि बंधु नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या पॅनलने पुर्णपणे धुळ चारली. माजी मंत्र्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाल्यानंतर आज झालेल्या संचालक निवडीतून चेअरमन, व्हाईच चेअरमन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे बिनविरोध निवडून आले आहे. माजी मंत्र्यांना गावातच चांगले धक्के बसले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा