Subscribe Us

header ads

ग्रामीण भागातील खेळाडूंना सिद्ध होण्यासाठी जीपीएलने मिळवून दिले स्थान -मोहन जगताप

बीड स्पीड 


ग्रामीण भागातील खेळाडूंना सिद्ध होण्यासाठी जीपीएलने मिळवून दिले स्थान -मोहन जगताप

जीपीएल क्रिकेट स्पर्धेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न


बीड, दि.23 (प्रतिनिधी)ः- ग्रामीण भागातील तरूणांच्या अंगी अनेक गुण असतात परंतू त्यांच्या गुणांना सिद्ध होण्यासाठी चांगले स्थान मिळत नसल्याने त्यांच्या गवगवा कुठे होत नसतो. यामुळे पत्रकार नितीन चव्हाण यांच्या संकल्पनेतून जि.के.चव्हाण साहेब प्रतिष्ठाणने ग्रामीण भागातील तरूणांच्या गुणाला वाव मिळावे म्हणून संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी विविध मान्यवराच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलतांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहन जगताप यांनी सांगितले की ग्रामीण भागातील खेळाडूना सिद्ध होण्यासाठी जिपीएलने स्थान मिळवून दिले असून आपण कुठले वाद न घालता संपूर्ण खेळ चांगल्या प्रकारे पार पाडावे.
यावेळी प्रमुख उपस्थिती छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहन जगताप, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव प्रा.पी.टी. चव्हाण, भाजप युवा नेते राहूल जगताप, एसपी ऑसिफचे प्रबंधक डी.जी.चव्हाण, बंजारा नेते अंकुश राठोड, सरपंच प्रकाश आळणे, गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पवार, अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुंदर राठोड, अधिकारी कर्मचारी संघटनेचे सचिव अर्जुन चव्हाण, माजी उपसरपंच शिवाजी चव्हाण, गोर सिकवाडी सहसंयोजक बिभीषण राठोड, नाळवंडी माजी सरपंच कृष्णा राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, उपजिल्हाध्यक्ष बाजीराव महाराज राठोड, बाळराजे राठोड, डॉ.कैलास काठवडे, डॉ.डी.जी.चव्हाण, ग्रा.प.सदस्य कैलास पवार, 
माजी सरपंच पापालाल राठोड, योगीराज कुरे, सुंदर 

जाधव यांच्यासह आदी मान्यवरांची होती. यावेळी मोहन जगताप यांनी बोलतांना सांगितले की, बंजारा समाजातील तरूणांच्या हाती ऊसतोडणीचा कोयता होता. मात्र आता तो कोयता जात विविध स्पर्धेत भागत घेव आपले स्थान मिळवित असल्याने त्यांचा अभिमान वाटत असून येणार्‍या पुढील काळात मी आपल्या अडी अडचणी सोडविण्यासाठी केव्हाही हाक द्या असे मत व्यक्त केले. त्यानंतर प्रा.पि.टी चव्हाण यांनी सांगितले की खेळाडूनी एक खेळ म्हणून खेळ खेळला पाहिजे हार जित कुणाचीही होवू द्या आपण आपले शरिर आणि मन तनदुरूस्त ठेवण्यासाठी खेळ खेळा त्यानंतर विवि मान्यवरानी आपले मत व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये राहूल जगताप यांनी 31 हजार रूपयाचे प्रथम पारितोषिक, शरद चव्हाण यांनी 21 हजार रूपयाचे द्वितीय पारितोषीक व डॉ. कैलास काठवडे यांनी 11 हजार रूपये आणि डॉ.युवराज चव्हाण, डॉ.डी.जी.चव्हाण, कैलास पवार यांनी उतेजनार्थ 6 हजार रूपयाचे असे भरघोस बक्षीस दिले आहे. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.प.सदस्य पापालाल चव्हाण, पोमा चव्हाण, पाडूरंग चव्हाण, लखन जाधव, अंकुश चव्हाण, सचिन चव्हाण, सुशिल राठोड, सुशिल चव्हाण, प्रेम चव्हाण, दिलीप चव्हाण, अतुल चव्हाण, विवेक राठोड,रोहन चव्हाण यांच्यासह आदींनी सहकार्य केल्यामुळे कार्यक्रमाचे उदघाटन यशस्वीपणे संपन्न झाले.



चांगल्या उपक्रमासाठी तरूणांच्या कायम सोबत -राहूल जगताप


गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण बंद असल्याने अनेक खेळांना व चांगल्या उपक्रमांना ब्रेक लागला होता. परंतू संसर्ग कमी झाल्यानंतर ग्रामीण भागातील खेळाडून एक संधी म्हणून नितीन चव्हाण यांनी सुरू केलेल्या जीपीएस क्रिकेट स्पर्धेमध्ये तरूणांनी  भाग घेत चांगल्या प्रकारे खेळ खेळावे तसेच यापुढीलही चांगल्या उपक्रमासाठी तरूणांच्या कायम सोबत राहणार असल्याचे प्रतिपादन राहूल जगताप यांनी व्यक्त केले.


यापुढेही विविध उपक्रमातून तरूणांना संधी मिळवून देवू -नितीन चव्हाण

ग्रामीण भागातील तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावे या हेतूने गोवर्धन नगर प्रिमीअर लिगच्या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तरी तरूणानी पुढे येत आपल्या सुप्त गुण येथे दाखवत सिद्ध व्हावे. तसेच येणार्‍या काळात येथील तरूणांसाठी विविध उपक्रमातून एक नवी संधी मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे पत्रकार नितीन चव्हाण यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा