Subscribe Us

header ads

तांदळवाडी घाट सेवा सोसायटी आ.संदीप भैय्यांच्या ताब्यात अख्ख पॅनल विजयी; माजी मंत्र्यांच्या पॅनलचा उडाला धुव्वा

बीड स्पीड न्यूज 


तांदळवाडी घाट सेवा सोसायटी आ.संदीप भैय्यांच्या ताब्यात
अख्ख पॅनल विजयी; माजी मंत्र्यांच्या पॅनलचा उडाला धुव्वा




बीड (प्रतिनिधी):- बालघाटावरील प्रतिष्ठेची समजली जाणारी तांदळवाडी घाट सेवा सोसायटीची निवडणूक एकतर्फी झाली असून आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या पुर्ण ताब्यात आली आहे. आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे अख्खे पॅनल विजयी झाले असून माजी मंत्री यांच्या पॅनलचा पुर्ण धुव्वा उडवला आहे. अनेक वर्षापासून माजी मंत्र्याचे या सोसायटीवर वर्चस्व होते. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्व जण तळ ठोकून असतांना आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाने मोठा विजय खेचून आणला आहे.तांदळवाडी घाट सेवा सहकारी सोसायटीवर गेल्या अनेक वर्षापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व होते. या वर्चस्वाला आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाने चांगलाच सुरूंग लावला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी माजी मंत्री यांच्या गटाचे अनेक दिग्गज गावात तळ ठोकून होते. मात्र गावातील मतदारांनी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या बाजुने मताचा कौल देवून विजयाचा गुलाल उधळायला 

लावला. या निवडणुकीत खोसे भागवत तुळजीराम, खोसे सुदाम पांडुरंग, खोसे हरिश्चंद्र देवराव, खोसे विक्रम भानुदास, सिरसट नितीन किसन, सिरसट बळीराम अर्जुन, भागडे लक्ष्मण महादेव, भागडे सुर्वणमाला मच्छिंद्र, भागडे तारामती जालींदर, काळे नाथा नामदेव हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. हा विजय खेचून आणण्यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे रामदास खोसे, बापूराव सिरसट, श्रीकृष्ण भागडे, समाधान खोसे, शहादेव खोसे, नामदेव खोसे, किसन खोसे, नवनाथ चव्हाण, हरिभाऊ कुमट, प्रवीण सिरसट, रमेश जगताप, सुंदर खोसे, बब्रुवान खोसे, संतोष खोसे, दिनकर सिरसट, उमेश खोसे, बाबू जगदाळे, निवांत चव्हाण, रंगनाथ सिरसट यांनी परिश्रम घेतले. या सर्व विजयी उमेदवारांचा आ.संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, वैजीनाथ नाना तांदळे, महादेव उबाळे, बबन बापु गवते, कर्डुले आबा आदींनी त्यांचे स्वागत केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा