Subscribe Us

header ads

वळणावर अंदाज चुकला अन कार कालव्यात कोसळली

बीड स्पीड न्यूज 

वळणावर अंदाज चुकला अन कार कालव्यात कोसळली

गेवराई_ दहाव्याचा कार्यक्रम आटोपून परत जात असताना औरंगाबाद येथील एका कुंटुबाची कार राक्षसभुवन जवळील वळणावर असलेल्या उजव्या कालव्यात कोसळल्याची थरारक घटना आज दुपारी घडली.  कार मधील कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने मदत केली.औरंगाबाद येथील अॅड. अविनाश बांगर कुटुंबासह आज सकाळी पाहुण्यांच्या दहाव्याच्या कार्यक्रमाला राक्षसभुवन येथे आले होते. कार्यक्रम आटोपून बांगर कुटुंबासह दुपारी दोनच्या सुमारास कारने ( क्रमांक एम. एच 20 एफ.वाय 3302 ) परतत जात होते. दरम्यान, राक्षसभुवन जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार बाजूच्या उजव्या कालव्यात कोसळली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.तहसीलदार सचिन खाडे व बाळासाहेब पखाले, विठ्ठल आम्लेकर हे या मार्गावरून प्रवास करत होते. अपघात निदर्शनास येताच खाडे यांनी तत्काळ गाडी थांबवली. तहसीलदार खाडे यांनी सहकारी आणि नागरिकांच्या मदतीने कालव्यात उतरून कारमधील नागरिकांना बाहेर काढले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा