Subscribe Us

header ads

मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमास जन्मठेप माजलगाव न्यायालयाचा महत्त्वपुर्ण निकाल

बीड स्पीड न्यूज 


पुरुषोत्तम घाटुळ यास बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा माजलगांव येथील दुसरे सत्र न्यायाधीश संतोष पी. देशमुख यांनी सुनावली.

माजलगाव_दि. १८.०२.२०२२ रोजी माजलगांव जिल्हा बीड येथील अपर सत्र न्यायाधीश श्री संतोष पी. देशमुख यांनी सदर प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम घाटुळ रा. सुर्डी नजीक, ता. माजलगाव, जि. बीड यास अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी दोषी ठरवून २०१९ चे बाल लैंगिक अत्याचार कायद्यातील नवीन तरतुदीनुसार अजीवन कारावासाची शिक्षा व दंड एकुन २६०००/- तसेच विविध कलमा अंतर्गत शिक्षा सुनावली आहे. दंडातील २५ हजार रुपये रक्कम पिडीत मुलीच्या आई वडीलांना देण्याचा आदेश करण्यात आला आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून पुर्वीचे बीड येथील अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. मिलींद केशवराव वाघीरकर साहेब तसेच त्यांना सहकार्य सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. रंनजित ए. वाघमारे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांना फिर्यादीच्या वतीने अॅड. आरती गाडेकर मॅडम व पोलीस प्रशासनाच्या बतीने एस.डी.पीओ कार्यालयाचे मोरे व पैरवी अधिकारी जाधवर इतर सहकारी.
या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी की, (पिडीत / फिर्यादी मुलगी लहान असल्याने तिचे नाव देण्यात आलेले नाही) तिचे मैत्रिणीकडे दिनांक १३.०७.२०२१ रोजी खेळण्यास गेली असताना मैत्रिनीला घराचे बाहेर कामाचे निमित्त सांगुन साडेआठ वर्षाच्या पिडीत मुलीवर मैत्रिणीच्या काकाने (आरोपीने) लैंगिक अत्याचार केला. व पिडीतेला जर कोणाला सागशील तर जिवे मारण्याची धमकी दिली. सदरील प्रकरणामध्ये पिडीतेच्या आईची तकार, पिडीतेचा जबाब, तिचा वडीलांचा आजोबाचा जबाब, तिची वैद्यकिय तपासणी, तिचे जन्माचे प्रमाणपत्र हस्तगत करून माजलगांव येथील तपासी अधिकारी एस.डी.पी.ओ. सुरेश पाटील साहेब यांनी करून दोषारोप पत्र माजलगाव येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणात फिर्यादीच्या विनंतीवरून बीड येथील त्यावेळेचे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील यांनी या प्रकरणात फिर्यादी, पिडीता माजलगांव येथील खाजगी रुग्नालयातील डॉक्टर, एस.आर.टी.आर कॉलेज अंबाजोगाई येथील महिला वैद्यकीय अधिकारी तसेच माजलगाव येथील वैद्यकीय अधिकारी पिडीतेचे आजोबा तपासी अधिकारी या सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले. आरोपीच्या वतीने दोन बचावाचे साक्षीदार त्याची आई व पुतणी तिचा जबाब नोंदवला सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. मिलींद वाघीरकर यांनी युक्तीवाद सादर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष. पी. देशमुख यांनी आरोपीला दोषी धरून कलम ३७६(अ) (ब) ५०६ भा.द.वी. तसेच कलम ५ (एम) सह ६, ९ (एम), सह १० या विविध कलमाअंतर्गत दोषी ठरविले. मुख्य कलम ६ बाल लैंगिक अत्याचार २०१२ व त्यामध्ये २०१९ मध्ये आलेल्या शिक्षेच्या नवीन तरतुदीनुसार आरोपीला अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा