Subscribe Us

header ads

शंभर प्लाटचे खरेदीखत बेकायदेशीर नोंदणी महानिरीक्षकाची कारवाईस टाळाटाळ न्यायासाठी शेख मोहम्मद जहिर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

बीड स्पीड न्यूज 


शंभर प्लाटचे खरेदीखत बेकायदेशीर
नोंदणी महानिरीक्षकाची कारवाईस टाळाटाळ
न्यायासाठी शेख मोहम्मद जहिर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण



बीड । प्रतिनिधी_शंभर प्लॉटची खरेदीखते बेकायदेशीरपणे करण्यात आली असून शासनाचे सर्व निकष डावलून अकृषी आदेश आणि मंजूर रेखांकन नसताना कमी बाजारमुल्य दाखवून फसवणे त्याच प्रमाणे निमयमाप्रमाणे पूर्ण कागदपत्रे नसतानाही तुकडे बंदी कायद्याचा भंग करुन खरेदीखते केल्याचा अहवाल जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी नोंदणी महानिरीक्षक पुणे यांना अहवाल सादर केला आहे. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही या प्रकरणी नोंदणी महानिरीक्षक दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने  दोषींवर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शेख मोहम्मद जहिर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी  (दि.17) उपोषणास बसले आहेत.बीड शहरातील इमामपूर रस्त्या लगत असलेल्या बिलाल नगरमध्ये शंभर प्लॉटची खरेदीखते येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमत करुन शासनाचे सर्व निकष डावलून अकृषी आदेश नसताना आणि मंजूर रेखांकन नसताना कमी बाजार मुल्य दाखवून शासनाला फसवले आहे. शिवाय नियमाप्रमाणे पूर्ण कागदपत्रे नसतान आणि तुकडे बंदी कायद्याचा भंग करुन बेकायदेशीरित्या खरेदीखते केलेली आहेत. हे सिद्ध झाले असून तसा अहवाल दि.14 व दि.15 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी नोंदणी महानिरीक्षक यांना पाठविला आहे. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी वरिष्ठ कार्यालयाची असल्याचे उपोषणकर्ते शेख जहिर यांना सह जिल्हा निबंधक यांनी पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे याप्रकरणातील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे उचित असतांनाही त्याबाबत नोंदणी महानिरीक्षक यांनी कोणतही ठोस पावले उचलली नसून जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी चार महिन्यांपूर्वी अहवाल सादर करुनही न्याय मिळत नसल्याने आज पुन्हा माझ्यावर उपोषण करण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते शेख मोहम्मद जहिर यांनी व्यक्त केली आहे. सदरील उपोषणास भ्रषटाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश ढवळे , सचिव संजय तांदळे व जे.आर शेख यांनी पाठिंबा दिला आहे।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा