Subscribe Us

header ads

आरोपींना अटक करण्यासाठी समाज बांधवांनी घातला गृहराज्यमंत्री यांना घेराव

बीड स्पीड न्यूज 


आरोपींना अटक करण्यासाठी समाज बांधवांनी घातला गृहराज्यमंत्री यांना घेराव


माळशिरस_गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई हे आज माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते, दौऱ्यामध्ये नसताना अचानक बदल करून गृहराज्यमंत्री देसाई यांनी वेळापूर येथे झालेल्या शेतमजुराच्या खुनाबाबत वेळापूर पोलीस स्टेशनला भेट देऊन चौकशी केली तसेच यावेळी त्यांनी वाघ कुटुंबियांशी संवाद साधला.वेळापूर, ता. माळशिरस  येथे दि. 15 फेब्रुवारी रोजी पैशासाठी शेत मजुराची  निर्घुण हत्या करण्यात आल्या असून या बाबतीत वेळापूर पोलिसात 1 ) शिवाजी विजय गायकवाड रा . खंडाळी 2 ) गणेश पाटील रा . चव्हाणवाडी 3 ) रामकृष्ण शिवाजी वाघमोडे रा . पिसेवाडी 4 ) राहुल माधवराव माने देशमुख रा . शेरी नं . 1 वेळापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भालचंद्र पोपट वाघ वय 38 वर्षे , रा . पिसेवाडी , ता . माळशिरस हे मयत झाले आहेत. मात्र अद्यापही एकही आरोपींना अटक करण्यात आली नाहीये. या पार्श्वभूमीवर ज्योती क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजकुमार हिवरकर, अरविंद राऊत, सांगोला तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे यांच्यासह सर्व समाज बांधवांनी आज वेळापूर येथे गृहराज्यमंत्री देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर प्रकरणात मी स्वतः लक्ष घातले असून सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्याकडे दिलेला आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांना लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्याचे या वेळी बोलताना शंभूराजे देसाई यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा