Subscribe Us

header ads

शहरवासियांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.संदीप भैय्यांची बैठक अमृत योजना, 'मास्टर प्लॅन'ची प्रत्यक्ष पाहणी

बीड स्पीड न्यूज 


शहरवासियांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.संदीप भैय्यांची बैठक अमृत योजना, 'मास्टर प्लॅन'ची प्रत्यक्ष पाहणी

बीड (प्रतिनिधी ):- मागील सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभाराने बीड शहरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांचे मुलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी व त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बीडचे  आमदार संदीप  क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.याअनुषंगाने सोमवार,दि.२८ फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे नगरपरिषदेचे प्रशासक उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह 

संबंधित अधिकाऱ्यांची आ.संदीप  क्षीरसागर यांनी बैठक घेतली. तसेच अमृत योजनेचे काम सुरू असलेल्या ठिकाणांची व बलभीम चौक ते जुना बाजार मास्टर प्लॅनची प्रत्यक्ष पाहणी केली.या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा झाली.या चर्चेतून बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून असलेल्या अडचणी दूर करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.शहरात सुरू 

असलेल्या भुयारी गटार अंतर्गत मलःनिसारण प्रकल्पातील मलः प्रक्रिया केंद्राच्या जागेच्या वाटाघाटी बाबत चर्चा करण्यात आली.अमृत योजनेच्या वीज कनेक्शन जोडणीसाठी नगर परिषदेकडील थकबाकी टप्प्याटप्प्याने भरणार आहे या अनुषंगाने आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नगरपरिषदेकडे असलेल्या उपलब्ध निधीची माहिती घेतली.शहरातील राष्ट्रवादी भवन ते लेंडी रोड या 

रस्ताकामात गेलेल्या चौदा कुटूंबियांच्या पूनर्वसनाबाबत चर्चा करण्यात आली.शहरातील पार्कींग व्यवस्थेसाठी प्रस्तावित जागेबाबत चर्चा करण्यात आली.तसेच नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी यांना घरकुल देण्याबाबत चर्चा करून निर्देश देण्यात आले.तसेच शहरात ज्या ठिकाणी अमृत योजनेचे काम होणार आहे त्याठिकाणी नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर रस्त्याचे काम प्रत्यक्षात करण्याबाबत निर्देश दिले.यासह शहरातील विविध प्रश्न व कामांचा आढावा घेत आवश्यक ते निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी दिले.या बैठकीस आ.सय्यद सलीम,माजी आ.सुनील धांडे यांच्यासह नगरपरिषद मुख्याधिकारी, महावितरण अधिकारी, जीवन प्राधिकरण विभाग अधिकारी यांच्यासह नगर परीषदेचे‌ सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा