Subscribe Us

header ads

‘शर्म करो मोदीजी...`, ‘माफी मांगे मोदीजी...`पंतप्रधानांच्या ‘त्या` वक्तव्याचे बीडमध्ये पडसाद जोरदार घोषणाबाजी करत बीड जिल्हा काँग्रेसचं आंदोलन

बीड स्पीड न्यूज 


‘शर्म करो मोदीजी...`, ‘माफी मांगे मोदीजी...`
पंतप्रधानांच्या ‘त्या` वक्तव्याचे बीडमध्ये पडसाद
जोरदार घोषणाबाजी करत बीड जिल्हा काँग्रेसचं आंदोलन


बीड । प्रतिनिधी_पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राविषयी तसंच काँग्रेसविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातही उमटले. जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये जोरदार घोषणाबाजी करत ‘शर्म करो मोदीजी‘, ‘माफी मांगो मोदीजी` चे फलक हातात घेवून काँग्रेस आक्रमक झाली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तसंच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ‘मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी‘, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, ‘माफी माँगो मोदीजी, शर्म करो मोदीजी अशी घोषणाबाजी यावेळी 

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, नवनाथ थोटे, गणेश बजगुडे,  ईश्‍वर शिंदे, अशेक देशमुख, दत्ता कांबळे, रवि ढोबळे, सय्यद फारुख, आसेफ बाबा खतीब, प्रविणकुमार शेप, अमर पाटील, आकाश गायकवाड, संभाजी जाधव, विष्णू मस्के, रंजित कसबे, गोविंद जेधे, आन्वर कुरेशी, रोहित निर्मळ,  अनिल जाधव, महेश बेद्रे, श्रीनिवास बेद्रे, नानासाहेब पवार, गणपत आप्पा कोरे, बहाद्दुरभाई, प्रकाशराव देशमुख, गणेश गंणणे, शिवाजीराव देशमुख, रंजित देशमुख, अशोक कांबळे, धर्मराज खोसे,  सुभाष देशमुख, हनुमान घोडके, इद्रीश हाश्‍मी, संतोष निकाळजे, अविनाथ डरफे यांच्यासह आदि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी- जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख

2014 च्या निवडणूकीत नरेंद्र मोजी यांनी देशातील 2 कोटी तरुणांना रोजगार देवून महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र याउलट देशात बेरोजगारांची संख्या वाढली. महागाई गगनाला भिडली. याकडे देशाचे पंतप्रधान मोंदी यांचे लक्ष नसून केवळ जातिवाचक बोलून समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक कोंडी होवून देश उध्द्वस्ततेकडे जात आहे. हे फार काळ टिकणार नाही. मोदींना महाराष्ट्राचा अवमान करण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. त्यांनी तात्काळ महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा