बीड स्पीड न्यूज
तीन दिवसाला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली चालू
बीड (प्रतिनिधी):- राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांनी कालच आपल्या भाषणात भुयारी गटार योजनेतंर्गत एसटीपी प्लान्ट्च्या जागेसंदर्भात तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना केल्या होत्या. अजितदादा काल बोलले आणि आज लगेच आ. संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिकेत प्रशासक व अधिकाऱ्यांची बैठक घेत
विविध कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर बैठक संपताच आ. संदीभैय्या स्वत: माजी आ.सय्यद सलिम, माजी आ. सुनिल धांडे यांच्यासह प्रशासक नामदेव टिळेकर, सीओ गुट्टे यांना सोबत घेवून पाहणीसाठी गेले होते. कामाचा पाठपुरावा आणि विषय हाताळण्याची चिकाटी हा आ.
क्षीरसागरांच्या अंगातील गुण पुन्हा एकदा पाहायला मिळाला. एसटीपी प्लांटचा प्रस्ताव तयार होताच तातडीने मुंबईला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक पार पडणार असून या बैठकीत ठरवण्यात आलेल्या उपाय योजने नंतर लवकरात लवकर बीड शहराला तीन
दिवसाला पाणीपुरवठा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.भुयारी गटार योजना व अमृत अटल योजनेसह बीड शहरातील अनेक समस्यांबाबत आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेत बैठक बोलावली होती या बैठकीला नगरपालिकेचे प्रशासक नामदेव टिळेकर यांच्यासोबत आ. संदीप भैय्या क्षीरसागर
यांनी विविध विषयांवर चर्चा केली. पेठ बीड भागातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंची वाढविण्याबाबत व परिसरातील सजावट करण्यासाठी लवकरच नगरपालिकेने प्रस्ताव तयार करावा व सदरील प्रस्ताव तयार होताच सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व
जिल्हाधिकारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेत सदरील प्रश्न सोडण्याच्या सूचना देतील आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिल्या. पेठ बीड भागातील मच्छी मार्केट इमारत व जुनी भाजी मंडई येथील मटन मार्केट तसेच फ्रुट मार्केट वापरण्यासाठी संबंधित विक्रेत्याने सोबत बैठक घेऊन योग्य ते निर्णय घ्यावा अशा सूचना नगरपालिकेच्या
प्रशासकाला आमदार क्षीरसागर यांनी दिल्या.बीड शहरातील नागरिकांना शहराच्या मधोमध असलेले आहे भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी यावे लागते येथे आल्यावर त्यांना अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ येते त्याच अनुषंगाने बुंदीन पुरा पेठ बीड या दोन्ही भागातील भाजी मंडईत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व तेथील सुशोभीकरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिला. आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासनही दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी ला जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते परंतु हि जयंती काही दिवसावर येऊन ठेपली असताना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण तात्काळ करण्यात यावे व त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. बीड शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्याचे कामे चालू आहेत सदरील कामेही कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार झाली पाहिजेत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन रस्ते, नाली याची स्वतः पाहणी करावी असे निर्देश आमदार क्षीरसागर यांनी दिले.
0 टिप्पण्या