Subscribe Us

header ads

अंबाजोगाईतील सराफा व्यापाऱ्याचे दागिने चोरणारे चोरटे सीसीटीव्ही मधे कैद

बीड स्पीड न्यूज 



अंबाजोगाई_ सोमवारी सकाळी चोरट्यांनी अंबाजोगाई येथील सराफा व्यापारी राहुल राठोड यांचे दीड किलो  सोन्याचे दागिने डिकीत ठेवलेली स्कुटी घेऊन चोरटे पसार झाले होते. या खळबळजनक घटनेमुळे व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, दिवसाढवळ्या भर चौकात चोरी झाल्याने चोरीचा 

त्वरित छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सदरील स्कुटी मोंढा भागात राजस्थानी मंगल कार्यालयाच्या पाठीमागील आढळून आली. पोलिसांनी स्कुटी ताब्यात घेत परिसराची पाहणी केली असता एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरटे स्कुटीमधून दागिने काढून पसार झाल्याचे दिसून आले आहे. दोन्ही चोरट्यांचे चेहरे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याने लवकरच चोरीचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक