Subscribe Us

header ads

युवा सामाजिक कार्यकर्ते श्रीरामवार च्या पाठपुरावा कडुन अटल मध्यान आहार भोजन योजनेचा प्रत्यक्ष लाभार्त्यास लाभ

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर

युवा सामाजिक कार्यकर्ते श्रीरामवार च्या पाठपुरावा कडुन अटल मध्यान आहार भोजन योजनेचा प्रत्यक्ष लाभार्त्यास लाभ

रुपेशकुमार श्रीरामवार यांच्या प्रयत्नातून 160 कामगारांना भोजन योजनेचा प्रत्यक्ष लाभ

 

उमरी :- येथे अटल मध्यान आहार भोजन योजना बांधकाम कामगार विभाग महाराष्ट्र शासन नांदेड. महाराष्ट्रातील शोषित, वंचित, संघटित व असंघटित बांधकाम कामगारांना शासनाच्या वतीने वीट बांधकाम व दगड बांधकाम कामगारांना अटल मध्यान भोजन योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत. उमरी तालुक्यातील सामाजिक युवा कार्यकर्ते रुपेशकुमार श्रीरामवार, रमेश कुंभारे यांच्या प्रयत्नातून 160 कामगारांना भोजन  योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला. आज शासनाच्या वतीने भोजन वितरित वाहनाचे व वाहन चालकाचे उमरी नगरीत स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीरामवार यांनी अटल मध्यान आहार भोजन योजनेची माहिती कामगारांना देत योजनेचा लाभ व फायदा लोकांना समजुन सांगत  कामगारांच्या हिता साठी सदैव पाठीशी आहे असे सांगितले व रमेश कुंभारे यांनी बोलतांना सांगितले की कामगारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व योजनेतील नविन माहिती देत या पुढेही शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यत लाभ मिळवुन देत राहु असे सांगितले या वेळी उपस्थित वाहन चालक दत्ता टारके, रुपेशकुमार श्रीरामवार, रमेश कुंभारे, गंगाधर पा.पुयड वीट बांधकाम गुत्तेदार मारुती बकुवाड, दिगंबर खांडरे, आनंदा राठोड व इतर वीट व दगड कामगार  आदी जन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा