Subscribe Us

header ads

किरण गित्ते अकॅडमीचा विद्यार्थी नितीन फड यांची इन्कम टॅक्स ऑफिसर पदी निवड

बीड स्पीड न्यूज 



किरण गित्ते अकॅडमीचा विद्यार्थी नितीन फड यांची इन्कम टॅक्स ऑफिसर पदी निवड

परळी (प्रतिनिधी )परळी येथील किरण गित्ते अकॅडमी च्या  यशस्वी वाटचाली मध्ये अजून एक मोलाची भर पडली असुन नितीन ज्ञानोबा फड राहणार मरळवाडी ता. परळी वैजनाथ या विद्यार्थ्याची सी जी एल ऑल इंडिया परीक्षेमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील मुलगा इन्कम टॅक्स ऑफिसर  झाल्याचा आनंद आई, वडील, नातेवाईक व शिक्षक मित्रपरिवारात होत आहे.परळी सारख्या ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षा आणि इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. किरण गित्ते साहेब ,सचिव नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन विभाग त्रिपुरा व विवेकानंद वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले. या ॲकेडीमीच्या माध्यमातून मागील ५-६ वर्षात प्रशासकीय सेवेमध्ये परळी चा टक्का सारखा वाढतो आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या निकालात परळी चा एक तरी उमेदवार पात्र होतोच.  किरण गित्ते व उषा गित्ते यांनी नितिन फड यांचे अभिनंदन केले व प्रशासकीय कारकीर्दी साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. इन्कम टॅक्स ॲाफिसर पदावर निवड झाल्यामुळे नितीन फड यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा