Subscribe Us

header ads

आळंदी परिसरात संत नरहरी महाराज मंदीर,वास्तु लोकार्पण व मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 


(वृत्तसंकलन व शब्दांकणःआत्माराम ढेकळे,पुणे)

आळंदी परिसरात संत नरहरी महाराज मंदीर,वास्तु लोकार्पण व मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न



पुणेः-श्री संत नरहरी सेवा संघ,पिंपरी चिंचवड च्या वतीने आळंदी परिसरात  संत नरहरी महाराज   मंदिरामध्ये श्री संत नरहरी महाराज,श्री विठ्ठल रुक्मिनी,श्री गणेश,आणि श्री स्वामी समर्थ यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना द्विदिवशीय भव्य कार्यक्रमाच्या आयोजनात करण्यात आली.तसेच विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदीर,वास्तुचे लोकार्पण करण्यात आले.दि.२ आणि ३एप्रिल २०२२रोजी च्या गुढीपाडवा,श्री स्वामी समर्थ प्रगटदिन पर्वकाळात भव्य दिव्य अशा नेत्रदिपक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  श्री संत नरहरी सेवा संघ या संस्थेच्या वतीने भोसरी आळंदी मार्गावर १५ गुंठे जमिनीवर लोकवर्गणीतुन श्री संत नरहरी महाराज मंदीर उभारण्यात आले.याठिकाणी श्री संत नरहरी महाराज ,श्री विठ्ठल रुक्मिनी,श्री गणेश आणि श्री स्वामी समर्थ यांच्या 

मुर्तीची विधीवत धार्मिक पध्दतीने कुलकर्णी गुरुजी  आले   यांच्या मार्गदर्शनाखाली बृम्हवृदांच्या मंत्रोच्चरात प्राणप्रतिष्ठापना समाजाच्या उपस्थितीत करण्यात आली.या कार्यक्रमास प्रामुख्याने भोसरी विधानसभाचे आमदार महेश लांडगे,नितीन आप्पा काळजे,संतोष अण्णा लोंढे आदी विविध राजकीय क्षेत्रातील व्यक्ती अनेक आजी-माजी पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठीत मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री मच्छींद्र शंकरराव खोल्लम यांनी भुषविले.कार्यक्रमास विविध स्तरातुन मान्यवरांची उपस्थिती होती .त्यामध्ये ओबीसी मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्य नेते लक्ष्मण हाके ,योगेश 

लांडगे,सुनील साळुंखे,सौ.निर्मलाताई गायकवाड,प्रदीप आबा तापकीर,सचिन तापकीर,आनंदा कुदळे,महेश भागवत तसेच विविध संस्था ,संघटनाचे पदाधिकारी  सुर्यकांत उमाकांत बेलेकर,नंदकुमार  फाकटकर,बंडोपंत/काशिनाथ फाकटकर, उमेश बीडकर,किरण चांदेकर,मनोहर बेलेकर,सुनील निकुंभ,प्रमोद काशीकर सहकारी,मकरंद फाकटकर,दीपक खोल्लम,संजय खोल्लम,चंद्रकांत वाडेकर,सौ.मंगलताई वाडेकर,सौ.मंगालाताई निघोजकर ,सुनील खोल्लम ,किरण चांदेकर,गणेश होनावळे,बाळासाहेब खोलमकर  तसेच विविध ठिकाणाहुन सर्व शाखीय सुवर्णकार समाज युवक,महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप करतांना मच्छिंद्र खोल्लम यांनी श्री संत नरहरी सेवा संघ या संस्थेस जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रामुख्याने आ.महेश लांडगे व श्री. विकास डोळस यांचे जाहीर आभार मानले.देणगीदार,हितचिंतक यांचेही  आभार व्यक्त केले.सर्व सोनार समाजास एकत्रित करुन समाजाची शक्ती बळकट करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील.असेही त्यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवर , देणगीदार , प्रमुख अतिथी यांचे संस्थेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.त्यामध्ये आळंदीचे प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते उमेश बीडकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र कपिले मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे ,योगगुरु सौ.अर्चना ईश्वर सोनार,बबनराव कुलथे, नामदेव सुवर्णकार आदींचा समावेश  होता.सदरचे मंदीर व जागा 

विश्वस्तांच्या वतीने लोकार्पण करण्यात आले.विश्वस्तांच्या वतीने उभारण्यात आलेल्या नामफलक कोनशिलाचे अनावरण याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अन्नदान/महाप्रसाद प्रामुख्याने किरण चाकणकर,सौ.विजया चाकणकर,माच्छिंद्र शंकरराव खोल्लम,शांताराम शंकरराव खोल्लम,राजेंद्र शंकरराव खोल्लम,श्रीकृष्ण शांताराम खोल्लम यांच्या वतीने करण्यात आले.महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला .सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी ,विश्वस्त मंडळातील उपाध्यक्ष विलासराव टकले,सचिव दत्तात्रय चांदेकर, कार्याध्यक्ष दिलीप फाकटकर,सहसचिव किरण चाकणकर,खजिनदार दिलीप खोल्लमकर,सह खजिनदार संजय बेदरकर,तसेच प्रकाश बेल्हेकर,श्रीकृष्ण खोल्लम,राजेंद्र सोनार आदी समाज बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन दत्तात्रय चांदेकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा