Subscribe Us

header ads

मुलीच्या लग्नासाठी सुर्यभान नाना मुंडे यांचा आर्थिक मदतीचा ओघ चालुच

बीड स्पीड न्यूज 


मुलीच्या लग्नासाठी सुर्यभान नाना मुंडे यांचा आर्थिक मदतीचा ओघ चालुच


परळी (प्रतिनिधी): परळी तालुक्यातील मौजे तळेगाव येथील अठरा पगड समाजातील मुलीच्या लग्नासाठी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा मार्केट कमिटीचे संचालक सुर्यभान नाना मुंडे यांच्या वतीने आर्थिक मदत करण्याची मोहिम सुरू असुन आज दिनांक 12 एप्रिल रोजी 2 मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 10 हजार रूपयांची नगद स्वरूपात मदत केली आहे.तळेगाव येथील सावळाराम दादाराव मुंडे व माणिक तुकाराम पारवे यांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत म्हणुन प्रत्येकी 10 हजार रूपये नगद स्वरूपात आर्थिक मदत देण्यात 

आली. यावेळी सुर्यभान मुंडे, नरसिंग सांगळे, रामराजे फड, पोलिस उपनिरीक्षक खरात, बुलढाणा बँकेचे शाखाधिकारी डोईफोडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, मार्केट कमिटीचे संचालक सुरेश मुंडे, सुनिल कोटेचा, गोल्डीशेट भाटिया, सुशिल डुबे, राजाभाऊ शेप, लक्ष्मण मुंडे, बाळासाहेब मुंडे, महारूद्र मुंडे, शुभम रामराजे फड, आत्माराम मुंडे, कालिदास घुगे, संतराम मुंडे, भागवत मुंडे, मुरलीधर मुंडे, राजाभाऊ गित्ते, बबलुशेट भंसाळी, विष्णु मुंंडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा