Subscribe Us

header ads

जि. प. सहशिक्षिका शेख सलमा रशीद आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 

जि. प. सहशिक्षिका शेख सलमा रशीद आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित


बीड (प्रतिनिधी) - शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत कर्तव्यावर असलेल्या सहशिक्षिका शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांना उदगीर येथे आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.शेख सलमा बेगम या शिक्षण क्षेत्रात एक अभ्यासू व जिज्ञासा असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. शाळेत एक शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासह इतर क्षेत्रात ही ते चांगले घडावे यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. यातूनच त्यांनी खास उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एक पुस्तक ही लिहिले असून त्या पुस्तकाची शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यासपीठावर नोंद घेतली जाते. अशाप्रकारे त्यांच्या चौफेर कामगिरीची दखल घेत लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा, प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड व सचिव प्रा. ज्योती मद्देवाड यांनी त्यांची आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड केली. हा पुरस्कार वितरण सोहळा उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील होते. तर ज्येष्ठ सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते विजय कदम आणि सैराट फेम आर्ची च्या वडिलांची भूमिका केलेले सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते शेख सलमा यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी हा पुरस्कार पती शेख समीर बागवान व दोन्ही पुत्रांसह स्वीकारला. शेख सलमा बेगम यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल बीड जिल्ह्याबाहेर घेतली जाऊन त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे शाळेतील मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषद शिक्षण विभाग बीड कडून ही अभिनंदन केले जात असून यापुढील कारकिर्दीत त्यांच्या हस्ते उत्तरोत्तर चांगले कार्य घडत राहावे. अशा शुभेच्छा देण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा