Subscribe Us

header ads

डॉ.बाबासाहेब आबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व परिसरातील सुशोभीकरण संदर्भात आ.संदीप भैय्यांनी घेतली आढावा बैठक

बीड स्पीड न्यूज 

डॉ.बाबासाहेब आबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व परिसरातील सुशोभीकरण संदर्भात आ.संदीप भैय्यांनी घेतली आढावा बैठक

अशोक भाऊ वाघमारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पुतळ्याची उंची वाढणार

बीड दि.09 (प्रतिनिधी) बीड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी आ.संदिपभैय्या क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेत जाऊन प्रशासक व इतर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेऊन  पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.बीड शहरातील पेठ बीड भागात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात बीड नगर पालिकेच्या माध्यमातून सिमेंट रस्त्यांचे काम झाल्यामुळे पुतळ्याची उंची व परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे यामागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी आ.संदीप क्षीरसागर यांना निवेदन दिले होते. त्यानंतर अशोक भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखालीच सर्व पक्षातील समाज बांधवांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व बीड मतदार संघाचे आ. संदीप क्षीरसागर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंची व परिसरातील सुशोभीकरण करण्यात यावे यामागणीसाठी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत आज आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी नगर पालिकेत जाऊन आंबेडकरी चळवळीतील समाजाचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.बीड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी आ. संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेत प्रशासक व इतर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. तसेच न.प.बीड ने प्रस्ताव तयार करून पालकमंत्री मा.ना. धनंजय मुंडे व मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश आमदार भैय्या क्षीरसागर न.प.प्रशासनाला दिले.यामुळे डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीचा व परिसरातील सुशोभीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने तसेच आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे  समाज बांधवांकडून स्वागत होत आहे. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व यासाठी सतत पुढाकार घेणारे अशोक भाऊ वाघमारे यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांच्याच पाठपुराव्यामुळे पुतळ्याची उंची वाढणार असल्याची चर्चा समाजात होत असून त्यांचे देखील समाज बांधवांकडून स्वागत केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा