Subscribe Us

header ads

बीड जिल्हा प्रभारी प्रा. किशन चव्‍हाण सत्कार व आढावा बैठक

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हा प्रभारी प्रा. किशन चव्‍हाण सत्कार व
आढावा बैठक 

बीड प्रतिनिधी/ दि.०९ वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्रा.किशन चव्हाण,बीड जिल्हा प्रभारी झाल्या नंतर प्रथमच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याकडे बीड जिल्हा संघटनात्मक बांधणी,आगामी निवडणुकीची तयारी,अशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी येत आहेत,त्या मुळे जिल्हा पदाधीकारी व कार्यकर्त्यांशी संवाद पदाधिकाऱ्यांची हितगुज होणार आहेत व जिल्ह्याचा आढावा घेऊन केंद्रीय कारल्यास कळवणार आहेत केंद्रीय कार्यास कळवणार आहेत,आढावा बैठक वंचित बहुजन आघाडी (प)बीड जिल्हा आयोजित जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपरिषद च्या होऊ घातलेल्या निवडणुका संदर्भात शुक्रवार दि. ११/०२/२०२२ रोजी दु.०२ वा.शासकीय विश्रामगृह गेवराई येथे संयुक्त बैठक बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा.किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला देखरेख व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष  प्रा. विष्णू जाधव, विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे , महिला आघाडीच्या बीड जिल्हा निरीक्षक ॲड. लता बामने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी तील पदाधिकाऱ्यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित   राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा