Subscribe Us

header ads

महामानव विश्वरत्न डाॅ.आंबेडकरांचा अपमान करणा-या न्यायाधीशाला बडतर्फ करून देशद्रोही घोषीत करा....जौंजाळ

बीड स्पीड न्यूज 


महामानव विश्वरत्न डाॅ.आंबेडकरांचा अपमान करणा-या न्यायाधीशाला बडतर्फ करून देशद्रोही घोषीत करा....जौंजाळ                  

बीड प्रतिनिधी_26जानेवारी2022रोजी कर्नाटक राज्यातील रायचुर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहनाच्या वेळी तेथील कर्मचा-याने नेहमीप्रमाणे म.गांधी व विश्वरत्न डाॅ.अंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवल्या होत्या .ध्वजारोहन करतेवेळी जिल्हान्यायाधीश  न्या.मल्लिकार्जून गौडा तेथेआले व त्यांचेहस्ते ध्वजारोहन होणार म्हणून त्यांना आग्रह करण्यात आला तेव्हा न्याय.गौडा यांनीचिडून असे सांगीतले की डाॅ.अंबेडकरांची तेथे ठेवलेली प्रतिमा तेथुन हटवा.तरच मी ध्वजारोहन करीन ,कर्मचारीवर्गाने त्यांना समजावून सांगायचाप्रयत्न केला परंतु न्या.गौडा प्रतिमा तेथुन हटवा या निश्चयावर अडून राहिले तेव्हा नाईलाजाने तेथील डाॅ.अंबेडकराची प्रतिमा हटविण्यात आली.वास्तविक शासनआदेश आहे की प्रजासत्ताकदिनी घटनाकारांची प्रतिमा ठेवली पाहिजे तसा शासन आदेश आहे.तरीही जातीय मानसिकता व मग्रूरपणा तसेच मनुवादी प्रवृत्तीअसलेल्या न्या.गौडाने महामानव विश्वरत्न डाॅ.अंबेडकरयांचा अपमान करून संपूर्णदेशातील लोकांना शरमिंदे केले आहे त्यामुळे भारतातील अंबेडकराईटविचारांच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.न्या.गौडा भलेही जिल्हान्यायाधीश असतील परंतु डाॅ.अंबेडकरांच्या तुलनेत ते एका किड्यामुंगीसारखे आहेत.इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीमध्येजगातीलसगळयात प्रभावशाली मानवतावादीलोकांचा मागील 10000वर्षाचा सर्व्हे करण्यात आला होता त्यामध्ये भ.बुद्ध प्रथमक्रमांकावर तर डाॅ.आंबेडकरचौथ्या क्रमांकावर आहेत तसेचअमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील मागील 1000वर्षातील 100विद्वानलोकांची एक यादी बनविण्यात आली होती त्या यादीत डाॅ.अंबेडकर हे प्रथम क्रमांकावर आहेत  भारतातदेखील2012 मध्ये द ग्रेटस्ट इंडियन म्हणून सर्व्हे करण्यात आला होता त्या मध्येसुद्धा डाॅ.आंबेडकर प्रथमस्थानी होते अशामहामानवाचा अपमान एक किड्यामुंगीसारखा न्याय.गौडाने केला  हे भारतीय जनता सहन करू शकत नाही.विश्वरत्न डाॅ. आंबेडकर संविधान निर्माता आहेत त्यांच्या संविधानातील भाग 6अनुच्छेद233व235 प्रमाणेजिल्हान्यायाधीशाची नियुक्ती होतेत्यानुसार न्या.गौडा त्या पदावर बसलेले आहेत परंतुअसा गद्दार,अन्यायिक,व जातीयवादी न्या.गोडा यांना त्यापदावरून  निष्काषित करा व देशद्रोहीघोषीत करून  त्यांच्यावर अॅट्राॅसिटी अॅक्टनुसार वकार्यवाहीकरावी.असा व्यक्ती न्यायिक होऊ शकत नाही म्हणून तातडीनेकार्यवाही करावी.नसता संपूर्ण भारतात अंबेडकराईटपार्टीऑफ इंडिया द्वारे अंदोलन छेडण्यात येईल।असे जिल्हाध्यक्ष जौंजाळ ए.बी. व त्यांचेसहकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे सदरील निवेदन जिल्हाधिकारी कार्यलयमार्फत राष्ट्रपती व कर्नाटकचे राज्यपाल यांना पाठवले आहे.            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा