Subscribe Us

header ads

'सिंहगड' पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात 'प्लॅनिंग अँड डिझाईन युजींग ऑटोकॅड' या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न

बीड स्पीड न्यूज 


'सिंहगड' पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात 'प्लॅनिंग अँड डिझाईन युजींग ऑटोकॅड' या विषयावर साप्ताहिक कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी_एस.के.एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूरये थील स्थापत्य अभियांत्रिकी विभागमध्ये व्दितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित 'प्लॅनिंग अँड डिझाईन युजींग ऑटोकॅड' या विषयावर आधुनिक पध्दतीचे ऑटोकॅड हे सॉफ्टवेअर वापरुनस्था पत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचे प्रारूप नकाशे तयार करण्याविषयीची साप्ताहिक कार्यशाळा संपन्न झाली असल्याची माहिती स्थापत्य अभियांत्रिकी  विभागाचे प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. गणेश लकडे यांनी दिली.हि कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, समन्वयक प्रा. गणेश लकडे, सह समन्वयक प्रा. रोहित गायकवाड यांच्या उत्कृष्ट नियोजनेतून आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेत एकूण २२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.कोविड १९ निर्बंधांच्या अनुषंगाने दोन डोसचे लसीकरण पूर्ण झालेले २२ विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. गणेश लकडे यांचे मार्गदर्शन लाभले.सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. रोहित गायकवाड यांच्यासह स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा