Subscribe Us

header ads

आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा वेळापूर येथे रास्ता रोको

बीड स्पीड न्यूज 


आरोपींना मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा 
वेळापूर येथे रास्ता रोको 

वेळापूर / आरोपींना मदत करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा त्याचबरोबर अन्य मागण्यांसाठी अकलूज सांगोला रस्त्यावरती पोलीस स्टेशन शेजारी आज सोमवारी शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वेळापूर, ता. माळशिरस  येथे दि. 15 फेब्रुवारी रोजी पैशासाठी शेत मजुराची  निर्घुण हत्या करण्यात आल्या असून या बाबतीत वेळापूर पोलिसात 1 ) शिवाजी विजय गायकवाड रा . खंडाळी 2 ) गणेश पाटील रा . चव्हाणवाडी 3 ) रामकृष्ण शिवाजी वाघमोडे रा . पिसेवाडी 4 ) राहुल माधवराव माने देशमुख रा . शेरी नं . 1 वेळापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भालचंद्र पोपट वाघ वय 38 वर्षे , रा . पिसेवाडी , ता . माळशिरस हे मयत झाले आहेत. 
गुन्हा घडते वेळी त्याचबरोबर गुन्हा घडल्यानंतर डॉक्टर व अन्य साथीदारांनी आरोपींना मदत केली, त्यामुळे त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपी करून घ्या तत्काळ अटक करा. गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करा तर कुटुंबाचे पुनर्वसन करा आदी मागण्यांसाठी वेळापूर येथे शांततेत  ग्रामस्थांनी रस्ता रोको केला.सदर रास्तारोको वेळी वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी उपस्थितांना सर्व मागण्या वरिष्ठांकडे कळवून या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असे आश्वासन दिले.  त्यानंतर उपस्थितांनी पोलीस निरीक्षक खारतोडे यांना निवेदन देऊन रास्ता रोको ची सांगता केली.

■ आरोपींना अटक, न्यायालयासमोर केले हजर !

काल रविवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून आज सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी माळशिरस येथील न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा