Subscribe Us

header ads

माजी मंत्र्यांना धक्का; आ.संदीप भैय्यांची बीड शहरावर पकड मजबुत माजी नगरसेवक सय्यद मुस्तफा, राम वाघ, जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड स्पीड न्यूज 

माजी मंत्र्यांना धक्का; आ.संदीप भैय्यांची बीड शहरावर पकड मजबुत
माजी नगरसेवक सय्यद मुस्तफा, राम वाघ, जाधव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड (प्रतिनिधी):- माजी मंत्री आणि नगराध्यक्ष यांना चांगलेच धक्के बसत असून आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांची बीड शहरावर पकड मजबुत होत आहे. राष्ट्रवादीत येणार्‍यांची संख्या वाढत असून बीड शहरातील माजी 

नगरसेवक सय्यद मुस्तफा, राजकीय आणि सामाजिक कार्यातील सक्रीय नेते राम वाघ, पोलीस बॉईज संघटनेचे गणेश जाधव यांच्यासह शेकडो युवकांनी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी 

काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला.रविवार दि.20 फेब्रुवारी रोजी अंकुशनगर भागात माजी नगरसेवक सय्यद मुस्तफा, राम वाघ, गणेश जाधव यांच्यासह शेकडो युवकांनी आ.संदीप भैय्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी 

काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या वेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, जैतुल्ला खान, अमोल पारवे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, सोनवणे मेंबर, वैजीनाथ नाना तांदळे, रमेश चव्हाण, अशोक रोमण, पंकज बाहेगव्हाणकर यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रवेश सोहळ्याने माजी मंत्री आणि नगराध्यक्षांना चांगलाच धक्का बसला असून राष्ट्रवादीत येणार्‍यांची संख्या वाढत असल्याने बीड शहरात राष्ट्रवादीची घडी मजबुत बनत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा