Subscribe Us

header ads

काळेगावची सेवा सोसायटी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात; बिनविरोध नवनिर्वाचित सदस्यांचा रविंद्र दादांनी केला सत्कार

बीड स्पीड न्यूज 


काळेगावची सेवा सोसायटी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात
बिनविरोध नवनिर्वाचित सदस्यांचा रविंद्र दादांनी केला सत्कार


बीड (प्रतिनिधी):- काळेगाव हवेली ता.बीड येथील सेवा सहकारी सोसायटी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात आली आहे. या सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत पॅनलच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यातील बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा आणि नवनिर्वाचीत चेअरमन यांचा गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर यांनी सत्कार केला. यावेळी बीड नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष हेमंत दादा क्षीरसागर काळेगावचे सरपंच चौरंगनाथ पवार यांची उपस्थिती होती.काळेगाव हवेली येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अख्खे पॅनल विजयी झाले.  चेअरमनपदी भागवत डोके तर उपचेअरमनपदी माणिक शेलार यांची तसेच दादासाहेब पवार, लहु डोके, अरूण कानडे, सुंदर वणवे, चुनुलाल पवार, प्रकाश ससाणे, लक्ष्मण काळे यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे. काळेगाव हवेलीची सरपंच चौरंगनाथ पवार, मानकुरवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर जाधव यांच्या प्रयत्नातून आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोसायटी बिनविरोध  राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. यातील सर्व नवनिर्वाचीत सदस्यांचा गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा