Subscribe Us

header ads

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅलीत हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल!

बीड स्पीड न्यूज 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅलीत हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल


बीड_  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅलीत हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करणे एका तरुणाला भलते अंगलट आले. स्टंटबाजीच्या व्हायरल फोटोवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली.गणेश उर्फ टिनू गोरख शिराळे (२२, रा. स्वराज्यनगर,) असे त्या आरोपीचे नाव आहे. १९ रोजी शिवरायांच्या जयंती निमित्त काढलेल्या रॅलीत दुचाकीवर उभे राहून हातात तलवार घेऊन गोरख शिराळे याने हिरोगिरी केली होती. याचा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. दरम्यान, २० रोजी देखील तलवार जवळ बाळगून तो फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पो. नि. सतीश वाघ यांना मिळाली होती, त्यावरून त्यांनी उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, विकास वाघमारे, मनोज वाघ, शेख नसीर, प्रसाद कदम, रामदास तांदळे यांचे पथक रवाना केले.बार्शी रोडवरील एका खासगी हॉस्पिटलसमोरुन सायंकाळी त्याला धारदार तलावरीसह ताब्यात घेण्यात आले. पोहेकॉ मनोज वाघ यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा