Subscribe Us

header ads

शार्टसर्कीटने पाच एकर ऊस जळून खाक

बीड स्पीड न्यूज 

शार्टसर्कीटने पाच एकर ऊस जळून खाक


बीड । वार्ताहर_तालुक्यातील गुंदेवडगाव आणि गंगनाथवाडी येथील शेतकर्‍यांचा पाच एकर ऊस शॉर्ट सर्कीटमुळे जळून खाक झाला आहे. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ताराच्या घर्षणामुळे ऊसाला आग लागल्याचे शेतकर्‍याने सांगितले. गुंदेवडगाव येथील आदिनाथ अश्रुबा खामकर आणि सतिष आश्रुबा खामकर या दोन शेतकर्‍यांच्या 5 एकर शेतातील ऊस जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या अधकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना तारा लोंबत असल्याचे वारंवार सांगुनही त्यांनी त्या न बदलल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.याप्रकरणी संबंधीत शेतकर्‍यांनी तहसीलदार आणि महावितरणकडे तक्रारही केली आहे. परंतू रात्री उशीरापर्यंत महावितरणचा कर्मचारी घटनास्थळी फिरकला नव्हता. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांनी येवून घटनेची माहिती घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा