Subscribe Us

header ads

त्रिरत्न बौद्ध विहार पंचशील नगर बीड येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी.

बीड स्पीड न्यूज 

 त्रिरत्न बौद्ध विहार पंचशील नगर बीड येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी.

बीड प्रतिनिधी_  शहरातील पंचशील नगर भागातील त्रिरत्न बौद्ध विहारामध्ये परिसरातील श्रद्धावान बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने काल त्यागमूर्ती माता रमाई यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वप्रथम उपासिकांनी माता रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यानंतर उपस्थित उपासकांच्या वतीने सामूहिकरित्या त्रिशरण,पंचशील 

तसेच बुद्ध पूजापाठ घेण्यात आला.यानंतर कु.सांची कांबळे या चिमुकल्या विद्यार्थिनीने माता रमाईंच्या विषयी छान असे भाषण केले.यानंतर ज्येष्ठ बौद्ध उपासिका आयु.कांबळे ताई तसेच माजी मुख्याध्यापक आयु.वाव्हळकर सर यांनी आपल्या भाषणातून माता रमाईचे जीवनकार्य व खडतर परिश्रम याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.जयंतीच्या 

कार्यक्रमास परिसरातील लहानथोरांसहित बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.अजय खेमाडे यांनी तर आभार प्रदर्शन आयु.वाघमारे साहेब यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी आयु.सदाशिव कांबळे यांनी थोडक्यात आपले विचार मांडले तसेच आयु.वाव्हळकर सर यांच्या वतीने आजच्या जयंती कार्यक्रमप्रसंगी सर्व 

उपस्थित उपासकांना फलाहार देण्यात आला.शेवटी सरणंतय गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला..कार्यक्रमाचे आयोजन आयु.वाव्हळकर सर यांच्या प्रयत्नाने तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयु.अजय खेमाडे,आयु.आदेश मगर,आयु.रोहित कुचेकर,आयु.आनंद खेमाडे,आयु.प्रेम आचार्य तसेच परिसरातील युवक-युवतींचे सहकार्य लाभले._

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा