Subscribe Us

header ads

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध, काळे झेंडे घेऊन शिवसैनिक उतरले रस्त्यावर

बीड स्पीड न्यूज 




बीड 8 फेब्रुवारी_
 बीडमध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झालीये. आज बीडमध्ये शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकास कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आम्ही आणलेल्या कामावर डल्ला मारत आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष कामं म्हणून या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र स्थानिक आमदार हे काम करताना आडकाठी आणत आहेत असं म्हणत शिवसैनिक आज बीडमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच प्रचंड घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून या विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याचा निषेध नोंदवला आहे. यानंतरही या कार्यक्रमात शिवसैनिक कार्यक्रमात गोंधळ घालणार असल्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, अजित दादा तुमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आघाडीचा धर्म शिकवा असं म्हणत बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आलीय. यावेळी काळे झेंडे घेऊन हे शिवसैनिक रस्त्यावर उतरले 

आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी विकास कामाच्या उद्घाटनावरून आमने-सामने आलीय आहे.बीड शहरातील शंभर कोटी पेक्षा जास्त विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रम होत आहे. स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर हे शिवसैनिकांना काम करू देत नाहीत. शिवसैनिकांनी आणलेल्या कामाचे  उद्घाटन परस्पर आमदार करत आहेत असा आरोप शिवसैनिकांनी केलाय.महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड मतदारसंघातील कामांना विशेष मंजुरी दिलेल्या आहेत. मात्र, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून आडकाठी आणली जात आहे. हा प्रकार न थांबविल्यास बीड जिल्ह्यात उद्घाटन दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार  असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा