Subscribe Us

header ads

पालकमंत्री मुंडेंच्या हस्ते डॉ. चव्हाण कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते डॉ. वासंती अमोल चव्हाण यांना कोविड योद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी माजी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी.
----
पालकमंत्री मुंडेंच्या हस्ते डॉ. चव्हाण कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित

--
बीड, दि. १० (प्रतिनिधी) : लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व उपचार व मानसिक आजार केंद्रातील भिषक व मधुमेह तज्ज्ञ डॉ. वासंती अमोल चव्हाण यांचा पालकमंत्री धंनजय मुंडे यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.मंगळवारी (ता. आठ) जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमांत हा गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांची उपस्थिती होती.यावेळी कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या निवडक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या पुढाकाराने कोविड योद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यात डॉ. वासंती अमोल चव्हाण यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी भिषक उत्तम जबाबदारी पेलली. याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन हेात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा