Subscribe Us

header ads

शहाजानपूर येथे त्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चार वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 

शहाजानपूर येथे त्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चार वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल


गेवराई_ वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून चार ऊसतोड मजुरांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे रविवारी रात्री उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. तर गेवराई तालुक्यातून होणारा अवैध वाळू उपसा प्रश्न ऐरणीवर आला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यानुसार या समितीने अहवाल देताच मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चार वाळू माफियांविरोधात मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहाजानपूर चकला हे सिंदफना काठावरील गाव आहे. या ठिकानाहून नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत होता. याठिकाणी नदीपात्रात केलेल्या खड्यात पाणी साचलेले आहे. याच पाण्यात बुडून शहाजानपूर येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे, आणि अमोल संजय कोळेकर, या नऊ ते बारा वर्षे वयाच्या बालकांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका या लोकांनी घेतल्याने मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन बीड-गेवराई महसूल व पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर मुलांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले होते.तसेच या प्रकरणाची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल येताच या प्रकरणी मयत मुलांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पांडूरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीप निर्मळ, व आर्जुन कोळेकर (सर्व रा.तांदळवाडी) यांच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि संदीप काळे हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा