Subscribe Us

header ads

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले - शिवचरीत्र व्याख्याते राहुल गिरी यांचे प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले - शिवचरीत्र व्याख्याते राहुल गिरी यांचे प्रतिपादन

बीड(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले असून त्यांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले असे प्रतिपादन युवा अभ्यासक तथा नामांकित वक्ते राहुल गिरी यांनी केले ते देवगिरी प्रतिष्ठान संचालित तुलसी शैक्षणिक समूह आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2022 व्याख्यानमालेत बोलत होते. १९ फेब्रुवारी रोजी तुलसी इंग्लिश स्कूल सभागृह बीड येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख व्याख्याते म्हणून मा.राहुल गिरी  यांना आमंत्रित करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप उपरे(राज्य अध्यक्ष ओबीसी परिषद,महाराष्ट्र), इंजि. विष्णू देवकते ( युवा मल्हार सेना अध्यक्ष, महाराष्ट्र),राजेश बांगर (माजी सभापती,पंचायत समिती पाटोदा),अशोक ठोकळ, शितलकुमार सुकाळे,प्रवीण शेवलकर,गणेश महादर,चंद्रप्रकाश शिंदे,प्राचार्य उमा जगतकर, प्राचार्य अश्विनी बेद्रे, प्राचार्य देविदास निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवचरित्र व्याख्याते राहुल गिरी यांनी पुढे बोलतांना सांगितले की, महाराजांचे कार्य दैदिप्यमान आहे. त्यांनी अन्यायाविरूद्ध आवाज उठवून स्वकियांमध्ये आत्मसन्मान जागविला. अद्वितीय योद्धा म्हणून महाराज जगभर परिचित आहेत. गनिमी काव्याचा प्रभावी उपयोग केला, देशात सर्वप्रथम नौसेनेची स्थापना केली, अनेक गड किल्ले उभारले. जातपात, धर्म यापेक्षा त्यांनी आपल्या राज्यकारभारात कतृत्वाला महत्व दिले. त्यांच्या राज्यात महिलांना सन्मानाची वागणूक दिली जात असे. सर्वाना एकत्र घेऊन त्यांनी बलाढ्य शत्रूचा सामना केला. आपल्या मावळ्यांच्या जीवाच्या बळावर राज्याचा विस्तार केला, असेही राहुल गिरी यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदीप रोडे यांनी महापुरुषांना जातीत बंदिस्त करू नका, महापुरुषांचे कार्य सर्वसमावेशक असून ते कुठल्या एका जाती व धर्मापुरते मर्यादित नसल्याचे सांगितले.कार्यक्रमा दरम्यान प्रतीक्षा सोनवणे या विद्यार्थिनीने "एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाच गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर" हे गीत सादर केले तर तुलसी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी सम्यक इनकर याने "शोधू कुठं रं, धावू कस रं, माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं" हे शिवगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सुधर्मा सावजी यांनी केले.प्रास्ताविक प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रियंका बचुटे यांनी मानले. यावेळी तुलसी इंग्लिश स्कूल,तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा