Subscribe Us

header ads

सार्वजनिक शिवजन्मोत्सव आवसगाव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.वक्तृत्व स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा चे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


सार्वजनिक शिवजन्मोत्सव आवसगाव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
वक्तृत्व स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा चे आयोजन


केज, (प्रतिनिधी) केज तालुक्यातील आवसगाव येथे गावातील  सार्वजनिक जन्मोत्सव समिती वतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,स्पूर्ती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ९ वा. कुलवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. व प्रतिमापूजन करून मॉंसाहेब जिजाऊ यांची वंदना घेऊन जयंती साजरी करण्यात आली.१९फेब्रुवारी १८७० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करण्यात आली. तेंव्हापासून आजतागायत देशात सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.जाती धर्माच्या बेड्या झुगारून सर्व धर्म समभाव याची शिकवण देणारे राजे,स्त्रियांचा आदर करणारे राजे,शुर पराक्रमी राजे म्हणून शिवाजी महाराजांची ओळख आहे.अशा रयतेचे राजे यांची जयंती साजरी करण्यात येते आहे.केज तालुक्यातील अवसगाव येथील  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती च्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली. संध्याकाळी आठ दरम्यान शिवचरित्र या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यासाठी स्पर्धक म्हणून  श्रीराम शिंगारे समर्थ शिंगारे सलोनी शेख वीरेंद्र साखरे अविष्कार साखरे श्रद्धा काकडे आर्या साखरे त्यांनी शिव चरित्र विषयी उत्कृष्ट असे भाषण केले.या वेळी , जय राम साखरे नाना आबा साखरे  प्रदीप काळे सचिन साखरे संतोष शिनगारे बन्सी अण्णा शिनगारे गणेश साखरे मनोज शिनगारे सुनील शिनगारे अविनाश साखरे जय किसान खडप श्रीनिवास साखरे सत्यजित शिरसागर परमेश्वर साखरे निलेश साखरे अशोक क्षीरसागर रोहन साखरे रामदास आखरे व सर्व ग्रामस्त व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा