Subscribe Us

header ads

अभूतपूर्व शिवजयंतीला नागरिकांनी डोळ्यात साठवून ठेवले!

बीड स्पीड न्यूज 


अभूतपूर्व शिवजयंतीला नागरिकांनी डोळ्यात साठवून ठेवले!

आ.क्षीरसागरांच्या शिवजयंतीला हजारो नागरिकांची हजेरी

बीड करांनी अनुभवले पहिल्यांदाच लेझर शो व चित्तथरारक बाईक स्टंट

बीड (प्रतिनिधी):- 19 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता बीड शहरामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 

पुतळ्या भोवती आकर्षक विद्युतरोषणाई बरोबरच लेझर शो च्या माध्यमातून सजावट करण्यात आली होती. सदरील लेझर शो च्या माध्यमातून करण्यात आलेल्या सजावटीमुळे जे विहंगम दृश्य दृष्टीस पडले ते दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी रात्री बारा वाजता हजारो 

शिवप्रेमी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्रित आले होते. याच ठिकाणी सर्वांनी फटाक्यांची आतिषबाजी करत महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला. तर सायंकाळी साडेसहा वाजता जे कधीही अनुभवले नव्हते अशीच चित्तथरारक बाईक स्टंट बीडच्या हजारो जनतेने 

अनुभवले. तसेच डोळ्यांचे पारणे फिटावे असे लेझर शो च्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या चित्र पेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड शहरामध्ये दाखवण्यात आला. यावेळी माजी आ.माजी आ.अमरसिंह पंडित, 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक आबा डक, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.सिराजभाई देशमुख, माजी आ.जनार्दन तुपे, ज्येष्ठ नेते डी.बी.बागल व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व 

उपस्थितांचे आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी आभार मानले.यावेळी मागील 17 वर्षापासून आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षी काहीतरी नवे संस्कृतिक कार्यक्रम बीड शहरातील जनतेला पाहायला मिळावेत 

याच नितळ भावनेतून भारताच्या कानाकोपर्‍यातून येणारे कलावंत बीड शहरातील जनतेला त्यांच्या राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रम दाखवत असतात. यावर्षीचे सांस्कृतिक कार्यक्रम हे काही वेगळे व तितकेच खास 

होते. लेझर शो अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीद्वारे महाराजांच्या जीवनावर आधारित असलेली एक चित्रफित दाखवण्यात आली. या चित्रपटाच्या माध्यमातून जो देखावा बीड करांनी पाहिला तो खरोखरच अविस्मरणीय म्हणावा लागेल. त्यामागचे कारण म्हणजे यापूर्वी कधीही अशा 

प्रकारचा देखावा बीड शहरातील जनतेने अनुभवलेला किंबहुना पाहिलेला नव्हता. महाराष्ट्राचे पारंपारिक वाद्य असलेल्या साधनांच्या माध्यमातून 400 कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून बीड करांचे कान तृप्त केले. तसेच यंदाच्या प्रमुख आकर्षण यापैकी एक असलेल्या बाईक स्टंटच्या कलावंतांनी गाडीवरील त्यांचे विविध स्टंट दाखवल्याने काही काळ नागरिकांच्या हृदयाचे ठोके चुकले होते. केबल टीव्हीवर बघितलेले हे बाईक वरील स्टंट जेव्हा बीडकर आणि स्वतः प्रत्यक्षात बघितले त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद स्पष्ट पाहायला मिळत होता.

सकाळी पार पडली शासकीय महापूजा

19 फेब्रुवारी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, पोलीस अधीक्षक आर राजा, आ.संदीप क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, मा.आ.सय्यद सलीम व मा.आ.सुनील धांडे यांच्यासह शेकडो शिवभक्तांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शासकीय महापूजा केली.

महिलांचा उदंड प्रतिसाद

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या या शिवजयंतीला महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय असते. मागील काही वर्षांपासून ही शिवजयंती पाहण्यासाठी महिला भगिनी घराच्या बाहेर पडू लागले आहेत. आज झालेल्या या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील बीड शहरातील व परिसरातील हजारो महिलांनी आपली उपस्थिती नोंदवली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा