Subscribe Us

header ads

छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले :पप्पू कागदे

बीड स्पीड न्यूज 

छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले :पप्पू कागदे


परळी / प्रतिनिधी_छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श स्वराज्य उभे केले. अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी उभे आयुष्य संघर्ष केला. त्याचबरोबर ज्यांची जयंती साजरी करत आहोत अशा माता रमाई यांनी आपल्या सर्वसुखाचा त्याग करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी त्या खंबीर उभ्या राहिल्या. म्हणूनच विश्व वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे समजोद्धारक महामानव आपल्याला लाभले असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंती निमित्त काळजावर कोरले नाव फेम अजय देहाडे आणि चेतन चोपडे यांच्या परिवर्तन गीतांचा कार्यक्रम परळीत आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. नगरसेवक सचिन कागदे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून फुले शाहू आंबेडकर क्रांतीकारी परिवर्तन गीतांचा जलसा परळी शहरात आयोजित करण्यात आला होता. काळजावर कोरले नाव फेम अजय देहाडे व चेतन चोपडे आणि त्यांचे सहकारी परिवर्तन गीतांचा भव्य कार्यक्रम सादर करन्यात आला. या कार्यकमास रिपाई प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नामदेवराव रोडे गुरुजी, माधव ताटे, देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड, सेवकराम जाधव मराठा सेवा संघ, शेख शरीफ एम.आय एम, भैय्या साहेब आदोडे, अमित घाडगे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक, संजय गवळी, सचिन रणखबे, जे.के कांबळे, सुभाष वघमारे उपस्थित होते.विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त आर.एच.व्हावळे, रानबा गायकवाड, दिलीप उजगरे,गौतम आगळे,सुकेशनी नाईकवाडे, संभाजी मुडे, अविनाश बद्दर, डी.के चिकाटे, गणेश आदोडे, रझाक कच्छी, रमेश रायभोळे, पृथ्वी शिंदे, विकास वघमारे यांचा हार फेटा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला न.प.गटनेते सचिन कागदे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दि.18 फेब्रुवारी रोजी सायं.6 वा.सिद्धार्थ नगर चौक एस.के. हॉटेल समोर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली विशेष महिलांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती,या कार्यक्रमाचे संयोजक सचिन कागदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांचे आभार नगरसेवक सचिन कागदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा